शेअर बाजारात मोठी पडझड, सेन्सेक्स १४०० अंकांनी कोसळला
मुंबई: मुंबई शेअर बाजारात शुक्रवारी दिवसाच्या सुरुवातीलाच निर्देशांकात १४०० अंकांची मोठी घसरण झाली. नव्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शेअर मार्केटमध्ये मोठी उलथापालथ पहायला मिळाली. गेल्या आठवड्यातही सेन्सेक्समध्ये ११०७. ४१ अंकांची मोठी घसरण पाहायला मिळाली होती. सलग दुसऱ्या आठवड्यात शेअर बाजारात पडझड पहायला मिळाली.
करोना व्हायरसमुळे आर्थिक प्रगतीला खीळ बसल्याने आधीच शेअर बाजारामध्ये निरुत्साह आहे. त्यात आता येस बँकेवरील निर्बंधांची भर पडली आहे. येस बँकेची आर्थिक स्थिती खराब असल्याने आरबीआयकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. बँकांच्या शेअर्समध्ये आज तेजी दिसत नाहीय. येस बँकेच्या शेअरमध्ये २५ टक्के तर एसबीआयच्या शेअरमध्ये सात टक्क्यांनी घसरण झाली आहे.
Shares of Yes Bank at Rs 27.65, down by 24.97%. Yes Bank was placed under moratorium by Reserve Bank of India (RBI) and the withdrawal limit was capped at Rs 50,000, yesterday. pic.twitter.com/VwJPcMAdCQ
— ANI (@ANI) March 6, 2020
शेअर बाजार खुला होताच निर्देशांकात १४०० अंकाची मोठी घसरण होऊन सेन्सेक्स ३७, ०११.०९ वर आला. येस बँकेचे शेअर २४. ६५ % नी गडगडले. बँकेचा ताळेबंद हा चुकीच्या पद्धतीने दाखवला जात असल्याचेही समोर आल्यानंतर आरबीआयने येस बँकेवर गुरुवारी निर्बंध घातले. त्यानंतर शुक्रवारी शेअर बाजार खुलताच येस बँकेचे शेअर्स पडले.
अमेरिकेला शिंक आली, की जगाला थंडी भरते, या म्हणीचा प्रत्यय शेअर बाजारात आला. अमेरिकेत 57 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाचा अमेरिकन अर्थव्यवस्थेला फटका बसण्याची शक्यता राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्तवली होती. त्यानंतर मुंबई शेअर बाजारावरही मोठा परिणाम पाहायला मिळत आहे.
News English Summery: At the beginning of the day, the index fell 1,400 points. The last week of the new month saw a big uptick in the stock market. In the previous week, the Sensex had seen a major fall of 1107. 41 points. In the second week in a row, the stock market saw a fall. The Sensex fell 37 points to close at 011.09 after the stock market opened. Yes Bank’s shares fell 24. 65%. The RBI imposed a ban on Yes Bank on Thursday after it was also revealed that the bank balance sheet was being shown incorrectly. Shares of Yes Bank fell after the stock market opened on Friday.
Web News Title: Stock Sensex collapsed below 1400 points in early trade because of Corona Virus and YES Bank crisis.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा