20 April 2024 3:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Godawari Power Share Price | अवघ्या 3 वर्षात 339% परतावा देणाऱ्या शेअरची पुढची टार्गेट प्राइस जाहीर, वेळीच फायदा घ्या Jubilant Pharmova Share Price | अल्पावधीत करा मोठी कमाई! हा शेअर देईल 70 टक्के परतावा, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर्स पुन्हा बुलेट ट्रेन तेजीत वाढणार, कंपनीकडून आली फायद्याची अपडेट Multibagger Stocks | असा स्वस्त शेअर निवडा! किंमत 32 रुपये, अल्पावधीत दिला 2500 टक्के परतावा, खरेदी करणार? Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये चढ-उतार, स्टॉक पुढे तेजीत वाढणार की घसरणार? Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर चार्टनुसार 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

भारत वगळता जगात मंदीचं सावट; पण त्याची कारणं संयुक्त राष्ट्रालाही माहित नाहीत

Corona Crisis, Covid 19, UNCTAD, United Nations

नवी दिल्ली, ३१ मार्च : करोना व्हायरसमुळे संपूर्ण जग या वर्षात मंदीचा सामना करणार आहे. काही ट्रिलियन डॉलरचं अर्थव्यवस्थांचं नुकसान होणार आहे. याचा मोठा फटका विकसनशील देशांना बसणार आहे, पण चीन आणि भारताला याचा फटका बसणार नाही, असा दावा संयुक्त राष्ट्राच्या व्यापार अहवालातून करण्यात आला आहे. जगातील दोन तृतीयांश लोकसंख्या विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये राहत असून करोनामुळे अभूतपूर्व आर्थिक नुकसानीचा सामना करत आहे. यूएनने यातून सावरण्यासाठी २.५ ट्रिलियन डॉलरच्या पॅकेजची गरज बोलून दाखवली आहे.

संयुक्त राष्ट्राच्या व्यापार आणि विकास संमेलनाच्या (यूएनसीटीडी) नव्या विश्लेषणानुसार, संयुक्त राष्ट्र व्यापार आणि विकास संस्थेचा ‘द कोविड-१९ शॉक टू डेव्हलपिंग कंट्रीजः टूवर्ड्स’ कार्यक्रम जगातील दोन तृतीयांश लोकांसाठी आहे. येत्या दोन वर्षांत समृद्ध निर्यातक देश कमो़डिटीतून विदेशातील गुंतवणुकीतून २ ट्रिलियन ते ३ ट्रिलियन अमेरिकन डॉलरपर्यंत घसरणीचा सामना करतील.

यूएनसीटी़डीने म्हटले की, नुकतेच काही दिवसांपूर्वी प्रगत अर्थव्यवस्थांबरोबर चीनने मोठ्या प्रमाणात सरकारी पॅकेजला एकत्र ठेवले आहे. जी २० प्रमुख अर्थव्यवस्था (जी २०) असणाऱ्या देशांच्या समूहानुसार, त्यांच्या अर्थव्यवस्थेत ५ ट्रिलियन डॉलरच्या जीवनरेखेचा विस्तार होईल. परंतु, या अहवालात जागतिक मंदीला भारत आणि चीन कसे अपवाद ठरतील हे विस्तृतपणे सांगितलेले नाही.

साधारणपणे सलग दोन तिमाही म्हणजेच सलग सहा महिने अर्थव्यवस्थेवरील नकारात्मक परिणामाला मंदी म्हणतात. अमेरिकेतील राष्ट्रीय आर्थिक संशोधन विभागाच्या व्याख्येनुसार, अर्थव्यवस्थेतील सर्व क्षेत्रांमध्ये सलग काही महिने घसरण होणे म्हणजे मंदी होय. याचा परिणाम जीडीपी, उत्पन्न, रोजगार, औद्योगिक निर्मिती आणि ठोक विक्रीमध्येही दिसतो.

 

News English Summary: The whole world is going to suffer a recession this year due to the Corona virus. A few trillion dollars is going to hurt the economy. A major blow to developing countries, but not to China and India, is a United Nations trade report. More than two-thirds of the world’s population lives in developing economies and is experiencing unprecedented economic losses due to corrosion. The UN has called for a $ 2.5 trillion package to address this. A recent analysis of the UN Council for Trade and Development (UNCTAD) points out some issues. The conference has released the report, ‘The COVID-19 Shock to Developing Countries: Towards a’ Whatever It Takes ‘Program for the Two-Thirds of the World Population Being Left behind’. The report says the economy, which exports essential commodities, will see a fall of $ 2-3 trillion in foreign investment for the next two years.

 

News English Title: Story corona virus world economy will go into recession with likely exception of India China says UN Report News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x