26 July 2021 2:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Special Recipe | विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी Sarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा जळगावमध्ये मोठं राजकीय नुकसान झाल्यानंतर मनसेची पुन्हा शाखा आणि पक्षविस्ताराला सुरुवात Sarkari Naukri | आयकर विभाग, मुंबईत 155 पदांची भरती | १० शिक्षण | पगार ५६ हजार कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत | संध्याकाळपर्यंत घोषणा तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे | मुख्यमंत्र्यांचं चिपळूणमधील व्यापाऱ्यांना आश्वासन Special Recipe | तर्री वाल जत्रे प्रमाणे झणझणीत मटण घरच्याघरी बनवा - वाचा रेसिपी
x

PM किसान सम्मान निधी वाटप | पंतप्रधानांकडून प्रत्येक हप्त्याचा जाहीर LIVE इव्हेंट

Pradhan Mantri Kisan Samman Nidhi scheme

नवी दिल्ली, १४ मे | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पंतप्रधान किसान सम्मान निधी योजने अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीचा आठवा हप्ता जारी करणार आहेत. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ते आज सकाळी 11 वाजता संवाद साधणार आहेत. पंतप्रधान कार्यालयानुसार आज 9.5 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 19 हजार कोटींहून अधिकची रक्कम वळती केली जाणार आहे. या वेळी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर देखील उपस्थित राहणार आहेत.

BhagyaVivah Marathi Matrimonial

PM किसान योजनेनुसार पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये आर्थिक मदत म्हणून दिले जातात. हे पैसे 2000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये वळते केले जातात. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात टाकली जाते. आतापर्यंत .15 लाख कोटी रुपये देण्यात आले आहेत.

सूचीमध्ये आपले नाव असे चेक करा

 1. जर आपण या योजनेसाठी नोंदणी केली असेल तर पंतप्रधान किसान पोर्टलवर (https://pmkisan.gov.in) वर जाऊन आपले नाव तपासू शकता. नाव तपासण्यासाठी आपण या प्रक्रियेला फॉलो करा.
 2. सर्व प्रथम पंतप्रधान किसानच्या अधिकृत वेबसाइटला https://pmkisan.gov.in भेट द्या.
 3. वेबसाइट उघडल्यानंतर मेनूबारमधील फार्मर कॉर्नरवर क्लिक करा.
 4. येथील लाभार्थी यादीवर क्लिक करा.
 5. यानंतर आपले राज्य, जिल्हा, उपजिल्हा, गट आणि गावची माहिती प्रविष्ट करा.
 6. यानंतर आपल्याला Get Report क्लिक करावे लागेल. या अहवालात आपल्या गावातील सर्व लाभार्थ्यांची माहिती मिळेल.
 7. या यादीमध्ये आपण आपले नाव तपासू शकता.

यादीमध्ये आपले नाव नसल्यास अशी तक्रार नोंदवा

 1. जर आपण नोंदणी केली असेल आणि आपले नाव लाभार्थ्यांच्या यादीमध्ये नसेल तर आपण पीएम किसान या वेबसाइटवरील हेल्पलाइन नंबरवर आपली तक्रार नोंदवू शकता.
 2. पीएम किसान हेल्पलाईन – 155261
 3. पंतप्रधान किसान टोल फ्री – 1800115526
 4. पंतप्रधान किसान लँडलाईन क्रमांक – 011-23381092, 23382401
 5. ईमेल आयडी [email protected] वर ईमेलद्वारे तक्रार देखील केली जाऊ शकते.

 

News English Summary: Today Prime Minister Narendra Modi will release the 8th instalment of financial benefit under Pradhan Mantri Kisan Samman Nidhi (PM-KISAN) scheme as on 14th May at 11 AM

News English Title: Today PM Narendra Modi will release the 8th instalment of financial benefit under Pradhan Mantri Kisan Samman Nidhi scheme news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1609)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x