3 May 2025 4:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

मोदी है तो मुमकिन है? | देशाच्या बेरोजगारीने गाठला कळस, मे महिन्यात 45.6 टक्क्यांची नोंद

CMIE report

नवी दिल्ली, ०६ जून | कोरोना महामारीत देशाच्या राजधानीत बेरोजगारीने उच्चांक गाठून ४५. ६ टक्के झाल्याची माहिती समोर आली आहे. ही आकडेवारी मुंबईस्थित सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई) संस्थेने दिली आहे. CMIE’च्या आकडेवारीनुसार एप्रिल २०२१ मधील बेरोजगारीचे प्रमाण २७.३ टक्क्यांवरून मे महिन्यात ४५.६ टक्के झाले आहे. विशेष म्हणजे, सलग चौथ्या महिन्यात देशाच्या राजधानीत बेरोजगारीचा दर वाढला आहे.

सीएमआयईच्या अहवालात काय म्हटले?

  1. फेब्रुवारी २०२१ मध्ये बेरोजगारीचा दर ८ टक्के होता.
  2. आकडेवारीनुसार देशात बेरोजगारीचा दर हा दिल्लीत सर्वाधिक आहे. त्यापाठोपाठ बेरोजगारीचे प्रमाण हरियाणात २९.१ टक्के, तामिळनाडूमध्ये २८ टक्के आणि राजस्थानमध्ये बेरोजगारीचे प्रमाण २७.६ टक्के आहे.
  3. याच काळात आसाममध्ये बेरोजगारीचे प्रमाण देशात सर्वात कमी म्हणजे ०.१ टक्के आहे.
  4. गुजरातमध्ये बेरोजगारीचे प्रमाण २.३ टक्के, कर्नाटक आणि मध्यप्रदेशमध्ये बेरोजगारीचे प्रमाण ५.३ टक्के आहे.
  5. देशामध्ये मे महिन्यात बेरोजगारीचे प्रमाण ११.९० टक्के राहिले आहे.
  6. शहरी भागात बेरोजगारीचे प्रमाण १४.७३ टक्के आणि ग्रामीण भागात बेरोजगारीचे प्रमाण १०.६३ टक्के राहिले आहे.
  7. गतवर्षी डिसेंबरमध्ये बेरोजगारीचे प्रमाण ९.०६ राहिले आहे. या बेरोजगारीचे प्रमाण घसरून मार्चमध्ये ६.५० टक्के झाले आहे.

आंतरराष्ट्रीय कामगार संस्थेच्या (आयएलओ) माहितीनुसार बेरोजगारीचा दर म्हणजे बेरोजगार व्यक्ती आणि एकूण मनुष्यबळातील बेरोजगार व्यक्तींचे प्रमाण असते.

 

News English Summary: Unemployment peaks in Corona epidemic It has come to light that it has gone up to 6 percent. These figures are provided by the Mumbai-based Center for Monitoring Indian Economy (CMIE). According to CMIE, the unemployment rate rose to 27.6 per cent in April 2021 from 45.6 per cent in May.

News English Title: Unemployment reached to 45.6 per cent in May 2021 said CMIE report news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Job Alert(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या