17 May 2021 2:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
संपूर्ण पोलीस दल कोरोना आपत्तीत लोकांसाठी कर्तव्यावर | तर राज्याचे पोलीस महासंचालक सुट्टीवर प. बंगाल | सीबीआय'च्या TMC नेत्यांवर धाडी, ममता बॅनर्जी थेट CBI कार्यालयात प. बंगालच्या राज्यपालांकडून खटला दाखल करण्याची परवानगी घेत TMC नेत्यांवर सीबीआयच्या धाडी गेल्या २४ तासांत २ लाख ८१ हजार ३८६ नवे कोरोना रुग्ण | ४,१०६ रुग्णांचा मृत्यू हट्टी मोदी सरकार वैज्ञानिकांचे सल्ले देखील ऐकत नाहीत | डॉ. जमील यांचा कोरोना सल्लागार गट प्रमुख पदाचा राजीनामा DRDO कोरोना औषध 2DG तयार | रुग्णांकडे लवकरात लवकर पोहोचविण्यापेक्षा लॉन्च इव्हेंटला महत्व तौते चक्रीवादळ, प्रशासन सतर्क | रायगडमध्ये 25200 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले
x

सरकारने मला परवानगी दिली तर मी पेट्रोल-डिझेल ३५-४० रुपयांना विकेन

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने मला परवानगी दिली तर मी पेट्रोल-डिझल ३५ ते ४० रुपये प्रति लिटर दराने विक्री करु शकतो असं धक्कादायक विधान योग गुरू बाबा रामदेव यांनी केलं आहे. सरकारने जर मला केवळ करामध्ये थोड्याफार प्रमाणात सवलत दिली तर मी ते शक्य करू शकतो, असं रामदेव म्हणाले आहेत.

BhagyaVivah Marathi Matrimonial

एनडीटीव्ही’ला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे आणि मोदी सरकारला पेट्रोल आणि डिझेलचे दर नियंत्रणात आणणे शक्य असल्याचे निदर्शनास आणून सरकारला कात्रीत पकडलं आहे. दरम्यान, वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमुळे महागाई मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने त्याचा सरकारला मोठा फटका सरकारला बसू शकतो, असं सुद्धा बाबा रामदेव यांनी सूचित केलं आहे. लवकरच निवडणूक येणार असून त्यापूर्वीच सरकारने दर कमी करणे आवश्यक आहे. तसेच केंद्र सरकारने इंधनाला जीएसटीच्या कक्षेमध्ये आणावं असंही ते म्हणाले.

काही दिवसांपूर्वी बाबा रामदेव यांनी मोदी सरकारवर महागाईवरून सडकून टीका केली होती आणि भारतीय चलनाच्या घसरत जाणाऱ्या किमतीवरून सरकारची अब्रू चव्हाट्यावर मांडली होती. भारतीय रुपयाची आंतरराष्ट्रीय बाजापेठेतील ही अवस्था बघून आता लाजेलाही लाज वाटत असेल, अशा शब्दात त्यांनी मोदी सरकारची पोलखोल केली होती.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x