15 May 2021 5:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
आपला शत्रू एक बहुरूपी आहे, तो कपडे बदलून फोटो काढत असतो - सुरेंद्र राजपूत ऑक्सिजन गळती दुर्घटनेच्या १० दिवसांनी नाशिकमध्ये प्रकटलेले, पण चंद्रकांतदादा म्हणाले फडणवीस आणि मी.... कोणत्या फेक न्यूज फॉलो करते ही? | म्हणाली, समजलं की ते गंगा नदीतील नाही तर नाजयेरियातील फोटो राजकीय विरोधकांचा 'छळ' ही एकमेव 'टूलकिट' मोदी, शहा आणि आदित्यनाथ वापरतात - काँग्रेस राज्याला अधिक मदत द्या असं फडणवीसांकडून मोदींना एकही पत्र नाही, पण सोनिया गांधींना पत्र लिहिण्यास वेळ काढला फडणवीसजी सरकार लोकांचे जीव वाचविण्यात व्यस्त, तुम्ही भाजपची माशा मारण्याची स्पर्धा भरवत बसा - राष्ट्रवादी ज्याचं अग्नी दहन व्हायला हवं होतं, त्यांना दफन केलं जातंय, तुम्ही कसले हिंदू रक्षक - काँग्रेस
x

CBSE बोर्डाच्या १०वीच्या परीक्षा रद्द तर १२वीच्या परीक्षा लांबणीवर

CBSE Exam

नवी दिली, १४ एप्रिल: CBSE बोर्डाच्या १०वी आणि १२वीच्या परीक्षेसंदर्भात केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. १०वीच्या परीक्षा रद्द केल्या असून १२वीच्या परीक्षा लांबणीवर टाकल्या आहेत. दरम्यान, १०वीच्या विद्यार्थ्यांनी दिलासा मिळाला असला तरी १२वीच्या विद्यार्थ्यांना मात्र परीक्षेतून पुर्ण सुटका मिळाली नाही आहे. आज (१४ एप्रिल) दुपारी १२ वाजता एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी शिक्षणमंत्री आणि इतर अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली. दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मे महिन्यात होणाऱ्या सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी जोर धरत होती.

BhagyaVivah Marathi Matrimonial

तर दुसरीकडे महाराष्ट्रात होणाऱ्या १०वी आणि १२वीच्या परीक्षा मे-जून महिन्यात घेतल्या जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती. तारीख अद्याप सांगितली नसून लवकर तारीखही सांगण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान, महाराष्ट्रात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमिवर तुर्तास परीक्षा पुढे ढकलण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे.

दहावीच्या रद्द करण्यात आलेल्या परीक्षांनंतर त्यांच्या गुणपत्रिकांसाठी सीबीएसई बोर्डाकडून विशिष्ट प्रणाली तयार केली जाणार आहे. परंतु, यामध्ये नेमक्या कोणत्या बाबींचा समावेश असेल? वर्षभरात झालेल्या परीक्षांचे गुण आधारभूत मानले जाणार आहेत का? याविषयी सविस्तर माहिती मिळू शकलेली नाही. दरम्यान, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून आता १ जून रोजी CBSE कडून करोना परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

 

News English Summary: The Central Government has taken a big decision regarding the 10th and 12th CBSE board exams. 10th exams have been cancelled and 12th exams have been postponed. Meanwhile, 10th standard students were relieved but 12th standard students were not completely relieved from the exam.

News English Title: The Central Government has taken a big decision regarding the 10th and 12th CBSE board exams news updates.

हॅशटॅग्स

#Education(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x