12 December 2024 8:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

Bhediya Day Box Office | भेडिया सिनेमाची धमाकेदार कमाई, प्रेक्षकांच्या प्रतिसादाने कलेक्शन जोमात

Bhediya Day Box Office

Bhediya Day Box Office | वरुण धवन आणि कृती सेनन स्टारर ‘भेडिया’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. चित्रपटाच्या दुसऱ्या दिवशीच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या रिपोर्टने निर्मात्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याचं काम केलं आहे. शनिवारी हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येने चित्रपटगृहात पोहोचले, त्याचा थेट फायदा मिळत आहे. हळूहळू या सिनेमाच्या कमाईला वेग येताना दिसतोय. शनिवारी या चित्रपटाने किती कमाई केली जाणून घेऊयात.

अपेक्षेप्रमाणेच वरुण धवन आणि कृती सॅनॉन स्टारर ‘भेडिया’ या सिनेमासाठी वीकेंड चांगला गेला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सकाळच्या शोजमध्ये प्रेक्षकांची संख्या कमी असली तरी रात्रीच्या शोजमध्ये थिएटर हाऊस फुल्ल होते. सुप्रसिद्ध चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांच्या रिपोर्टनुसार, या सिनेमाने आतापर्यंत 17 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.

‘भेडिया’साठी वीकेण्ड मस्त
तरण आदर्श यांच्या मते, चित्रपटाची कमाई हळूहळू वाढत आहे. प्रेक्षकांच्या दृष्टीने राष्ट्रीय साखळ्यांचा आलेख वरच्या दिशेने जात आहे. शुक्रवारी चित्रपटाने ओपनिंग डेला 7.48 कोटींची कमाई केली, तर शनिवारी हा आकडा वाढून 9.57 कोटी रुपये झाला. देशातील चित्रपटाची एकूण कमाई १७.०५ कोटी रुपये आहे.

भेडियाच्या कमाईमुळे आशा पल्लवित
25 नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या ‘भेडिया’ या हॉरर-कॉमेडी चित्रपटात वरुण धवन पहिल्यांदाच वेअरवॉल्फच्या भूमिकेत दिसत आहे. ‘स्त्री’, ‘बाला’सारखे जबरदस्त सिनेमे बनवणाऱ्या अमर कौशिकच्या ‘भेडिया’ या सिनेमाकडूनही खूप अपेक्षा आहेत. शनिवारच्या दिमाखदार कलेक्शननंतर आता नजर आहे ती रविवारच्या कलेक्शनवर.

वरुण धवन आणि कृती सॅनॉन स्टारर या उत्तम व्हीएफएक्सने सजलेल्या चित्रपटाच्या निर्मितीसाठी 60 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. ‘भेडिया’मध्ये वरुण धवन आणि कृती सॅनन यांच्याशिवाय अभिषेक बॅनर्जी आणि दीपक डोबरियाल यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. अमर कौशिक दिग्दर्शित हा सिनेमा धूमधडाक्यात आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Bhediya Day Box Office day 2 collection check details on 27 November 2022.

हॅशटॅग्स

#Bhediya Day Box Office(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x