15 December 2024 4:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा
x

Bigg Boss Season 5 | भाऊचा धक्का, बिग बॉस सोडून रितेश परदेशात, पत्नी जीनिलियाने शेअर केला 'तो' व्हिडिओ - Marathi News

Highlights:

  • Bigg Boss Marathi
  • सुंदर कॅप्शनसह जीनिलियाने शेअर केला रितेशचा व्हिडिओ :
  • कोण होणार महाविजेता :
Bigg Boss Marathi

Bigg Boss Marathi | मराठी बिग बॉसच्या पाचव्या सिझनला प्रेक्षकांकडून चांगलाच वाव मिळत असल्याचा पाहायला मिळतोय. दरम्यान हा शो आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. येत्या 6 ऑक्टोबरला महाअंतिम सोहळा पार पडणार असून बिग बॉसची ट्रॉफी कोण घरी घेऊन जाणार हे सर्वांनाच कळणार आहे. परंतु गेल्या दोन आठवड्यांपासून प्रेक्षक घरी बसून ज्या दिवसाची वाट पाहतात तो दिवस म्हणजे भाऊचा धक्का. जो शनिवार आणि रविवारी पार पडत असतो.

परंतु रितेशने दोन आठवडे भाऊच्या धक्क्यावर अनुपस्थिती दाखवली. यादरम्यानच्या अनेक अफवा आणि चर्चांना सोशल मीडियावर उधान आलं होतं. रितेशने बिग बॉस शो सोडला की काय असे प्रश्न अनेकांना पडत होते. परंतु बिग बॉस यांनी खुलासा करत रितेश थेट 6 ऑक्टोंबरला महाअंतिम सोहळ्याला उपस्थिती दर्शवणार आहेत अशी घोषणा केली. तरी सुद्धा रितेश नेमका कुठे आहे असा प्रश्न अनेकांच्या मनात होता. दरम्यान पत्नी जीनिलियाने प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तर दिलं आहे. तिने रितेश आणि तिच्या मुलांचा परदेशामधील एक व्हिडिओ इंस्टाग्राम स्टोरीला शेअर केला आहे.

सुंदर कॅप्शनसह जीनिलियाने शेअर केला रितेशचा व्हिडिओ :

रितेशची पत्नी जेनिलियाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये रितेश त्याच्या दोन्ही मुलांबरोबर राहील आणि रियान यांच्याबरोबर परदेशात फिरत असल्याचा दिसत आहे. फिरत असताना तिघांनीही निळ्या रंगाचे जॅकेट परिधान केलं आहे. व्हिडिओमध्ये रितेश आणि त्याची दोन मुलं रस्त्यावरून फेरफटका मारत असताना गंमत आणि मस्ती करत आपल्या वडिलांबरोबर वेळ घालवताना दिसत आहेत. या होमली व्हिडिओला जेनेलियाने कॅप्शन लिहिलंय की,”जेव्हा ते 20 दिवसांनी बाबांना भेटतात तेव्हा आई पूर्णपणे विसरली जाते आणि फोटो/व्हिडिओ काढण्यापुरती मर्यादित असते”. असं क्युट रिएक्शन असणारं कॅप्शन जिनिलियाने दिल आहे.

कोण होणार महाविजेता :
दरम्यान फिनाले पिरियड सुरू असताना. कोणत्या सदस्याला सर्वात जास्त वोटिंग मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे. काहींना वाटतंय की, अभिजीत सावंत बिग बॉसची ट्रॉफी उचलणार तर, काहींना वाटतय की, सुरज चव्हाणच बिग बॉसच्या ट्रॉफीचा मानकरी होणार. परंतु ही धुरा सदस्यांच्या नाही तर प्रेक्षकांच्या हाती आहे. सदस्याला सर्वात जास्त वोटिंग मिळणार तोच बिग बॉसच्या घराची ट्रॉफी उचलणार. दरम्यान उरलेल्या या एका आठवड्यात बिग बॉस सदस्यांसमोर कोणकोणते नवनवीन टास्क समोर आणून ठेवणार याकडे देखील अनेकांचे लक्ष लागलेले आहे.

Latest Marathi News | Bigg Boss Marathi Season 5 Update 30 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Bigg Boss Marathi(34)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x