12 August 2022 2:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SIP Investment | म्युचुअल फंड योजनेत दरमहा फक्त 1000 रुपये जमा करा, 2 कोटींपेक्षा जास्त परतावा मिळतोय Syrma SGS Technology IPO | सिरमा एसजीएस टेक्नॉलॉजीचा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला, गुंतवणुकीची मोठी संधी Multibagger Stocks | या स्टॉकने गुंतवणूकदारांना केले करोडपती, 2 रुपयांच्या शेअरने 1 लाखाच्या गुंतवणुकीचे 16 कोटी केले Jhunjhunwala Portfolio | झुनझुनवाला यांनी खरेदी केलेला हा स्टॉक रॉकेट सारखा वाढतोय, बाजार तज्ञांचा खरेदी करण्याचा सल्ला GST on Rented Home | आता भाड्याच्या घरात राहणाऱ्यांना भरावा लागणार 18% GST, मोदी सरकारचे नवे नियम लक्षात ठेवा Multibagger Penny Stocks | 17 रुपयाच्या शेअरने 11,225 टक्के परतावा दिला, अजून 50 परतावा देऊ शकतो, गुंतवणुकीची सुवर्ण संधी LIC Credit Card | पॉलिसीधारकांनो, आता तुम्हाला घरबसल्या फ्री LIC क्रेडिट कार्ड मिळेल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
x

संघाची तालिबानशी तुलना, जाहीर चर्चा करा नाही तर माफी मागा | नितेश राणेंचं जावेद अख्तरांना पत्रं

MLA Nitesh Rane

मुंबई, ०६ सप्टेंबर | प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी केली होती. त्यावरून वादंग निर्माण झालं आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी अख्तर यांना पत्रं लिहून या मुद्द्यावर जाहीर चर्चा करा नाही तर जाहिररित्या माफी मागा, असं आव्हानच दिलं आहे. त्यामुळे जावेद अख्तर त्याला काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.नितेश राणे यांनी जावेद अख्तर यांना दोन पानी पत्रं पाठवलं आहे. त्यात त्यांनी अख्तर यांच्या संघाच्या तालिबानशी युती करण्याच्या मुद्द्याला आक्षेप घेतला आहे. संघाची तुलना तालीबानशी करणं हा नियोजीत षडयंत्राचा भाग आहे. तालिबानी प्रवक्त्यासारखी भुमिका घेत कुटनितीनं हिंदुत्वाशी तुलना करण्यात आली आहे. हिंदुत्वाबद्दल एवढा राग कशासाठी?, असा सवाल राणेंनी केला आहे.

संघाची तालिबानशी तुलना, जाहीर चर्चा करा नाही तर माफी मागा, नितेश राणेंचं जावेद अख्तरांना पत्रं – BJP MLA Nitesh Rane ultimatum to Javed Akhtar over comparing RSS with Taliban :

हिंदु धर्माबद्दलच्या अज्ञानाबद्दल आपली दया येतेय:
कम्युनिस्ट विचारधारा असणाऱ्या सासुसरवाडीचा तुमच्यावर चांगलाच प्रभाव आहे. जो व्यक्ती जिथ राहतो त्यावर प्रेम करतो. मग त्याचा धर्म आणि उपसना पद्धती कोणतीही असली तरी तो आमच्यासाठी हिंदूच आहे. हिंदु धर्माबद्दलच्या अज्ञानाबद्दल आपली दया येतेय, असंही त्यांनी म्हटलं आहे.तुम्हाला महिलांच्या हक्काबद्दल किती माहिती आहे? ट्रिपल तलाकच्या वाईट परंपरेवर तुम्ही कुठे होता?, असा सवाल करतानाच तुम्हाला एक आठवड्याची मुदत देतो. कोणतही सार्वजनिक व्यासपीठ किंवा न्यूजरूम निवडा या मुद्द्यावर आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. अन्यथा बिनशर्त माफी मागा, असंही त्यांनी म्हटलं होतं.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: BJP MLA Nitesh Rane ultimatum to Javed Akhtar over comparing RSS with Taliban.

हॅशटॅग्स

#Nitesh Rane(99)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x