1 May 2025 7:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

Bigg Boss 16 | गंधी बात फेम फ्लोरा सैनी दिसून येणार बिग बॉस 16 मध्ये, शो होणार अधिकच रंजक

Flora Saini

Bigg Boss 16 | चाहत्यांच्या प्रतिक्षेनंतर लवकरच बीग बॉस 16 ला सुरुवात होणार आहे. माध्यमांनुसार काही वेळापासून स्पर्धकांची नावे समोर येत आहेत त्यातच आणखी एक नाव समोर आले आहे ते म्हणजे, गंदी बाद फेम फ्लोरा सैनी या शो मध्ये दिसून येणार आहे. तिच्या येण्याने शो अधिकच रंजक होईल असे अटकळ बांधले जात आहेत. तसेच या शोमध्ये आणखी गाजलेले चेहरे पहायला मिळणार आहेत. ज्यामध्ये मुनव्वर फारुकी ते कनिका मान यांच्या नावांचा समावेश आहे, मात्र या नावांवर शिक्कामोर्तब झालेला नाही.

कोण आहे फ्लोरा सैनी
फ्लोरा सैनी सध्याच्या काळामध्ये खूप चर्चेत आहे. विशेषतः ओटीटीवर तिचे मोठे नाव आहे तर फ्लोरा तिच्या बोल्डनेससाठी अधिक ओळखली जाते. फ्लोरा सैनी गंधी बात, सिटी ऑफ ड्रीम्स, मेड इन इंडिया, इनसाइड एज या मालिकांमध्ये खूप बोल्ड सीन्स दिले आणि या मालिकांनंतर ती अधिक लोकप्रिय झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर फ्लोरा सैनीलाही बिग बॉस 16 साठी संपर्क साधण्यात आला आहे मात्र आता या बातम्यांमध्ये कितपत तथ्य आहे, हे सध्या शो सुरू झाल्यानंतरच कळेल.

बिग बॉस 16 चा पहिला प्रोमो समोर आला :
काही काळापुर्वीच बिग बॉस 16 चा प्रोमो समोर आला आहे, यावरून स्पष्ट झाले आहे की यावेळी हा गेम कोणत्याही नियमांशिवाय चालणार आहे कारण यावेळी बिग बॉस स्वतः हा गेम खेळणार आहे. बिग बॉस 16 चा प्रोमो समोर आल्यानंतर, हे स्पष्ट झाले आहे की बिग बॉस 16 चा प्रवास स्पर्धकांसाठी इतका सोपा असणार नाही आणि त्यांना यावेळी दुप्पट मेहनत करावी लागणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Flora Saini (@florasaini)

हे चेहरे दिसून येणार
बिग बॉस 16 चा शो 1 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे, ज्यामध्ये राज कुंद्रा, मुनव्वर फारुकी, कनिका मान, ट्विंकल कपूर, शिवीन नारंग दिसणार आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Flora Saini of Gandi Baat fame will be seen in Bigg Boss 16 Checks details 15 september 2022

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Flora Saini(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या