30 April 2025 2:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

Raju Srivastav Passes Away | लाखो लोकांना हसवणारा आज अनेकांना रडवून गेला, कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचं निधन

Raju Srivastav Passes Away

Raju Srivastav Passes Away ​​| प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचं दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झालं आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 10 ऑगस्ट रोजी जिममध्ये व्यायाम करताना त्यांची तब्येत बिघडली. यानंतर त्यांना एम्स दिल्ली येथे दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. जेव्हा परिस्थिती सुधारली नाही, तेव्हा त्यांना लाइफ सपोर्ट सिस्टमवर ठेवण्यात आले होते.

दरम्यान, त्यांच्या कुटुंबियांकडून सतत अपडेट्स येत होते. उपचारादरम्यान त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याची बातमीही आली होती, मात्र आता त्यांच्या निधनाच्या दु:खद बातमीने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

लाखो लोकांना हसवणारा आज रडवून गेला :
त्यांनी अनेक लोकप्रिय कार्यक्रमांमध्ये काम केले होते. ते देशाचे लोकप्रिय विनोदी कलाकार म्हणून प्रसिद्ध होते. ग्रँड इंडियन लाफ्टर चॅलेंज, बिग बॉस, शक्तीमान, कॉमेडी सर्कस, द कपिल शर्मा शो असे प्रसिद्ध शो त्यांनी केले. याशिवाय त्यांनी मैने प्यार किया, तेजाब, बाजीगर या बॉलिवूड चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका केल्या होत्या. नुकतंच ते इंडियन लाफ्टर चॅम्पियनमध्ये खास पाहुणे म्हणून दिसले होते.

कॉमेडी स्ट्रगल :
एका मुलाखतीत राजू कॉमेडी शोजबद्दल म्हणाला होते, “मी जेव्हा मुंबईत आलो तेव्हा लोकांना कॉमेडियन फारसे समजत नव्हते. अशावेळी जॉनी वॉकरपासून विनोद सुरू होतात आणि शेवट होतो तो जॉनी वॉकरपर्यंत. तेव्हा स्टँडअप कॉमेडीला जागा नव्हती, त्यामुळे मग मला हवी ती जागा मिळाली नाही.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Raju Srivastav Passes Away check details 21 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Raju Srivastav Passes Away(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या