Salman Khan | सलमानच्या वडिलांना गँगस्टर लॉरेंस बिश्नोईकडून पुन्हा धमकी, महिला म्हणाली, 'लॉरेंस को भेजू क्या' - Marathi News
Highlights:
- Salman Khan
- अशी मिळाली सलीम खान यांना धमकी :
- खूप आधीपासूनच सलमानच्या जीवावर उठलाय गॅंगस्टर बिश्नोई :
Salman Khan | रिपोर्टनुसार बॉलीवूड ॲक्टर सलमान खान याच्या घराबाहेर काही महिन्यांपूर्वीच गँगस्टर लॉरेन्स बिश्नोइकडून गोळीबार करण्यात आला. त्यानंतर पुन्हा सलमान खानच्या वडिलांना म्हणजेच सलीम खान यांना गँगस्टरकडून थरारक धमकी मिळाली आहे. ही धमकी फोनवर नाही, चिठ्ठीवर नाही तर डायरेक्ट समोरून आली आहे. धमकी ऐकल्याबरोबर सलीम खान अत्यंत घाबरून गेले आहेत. सोबतच त्यांनी पोलीस चौकीमध्ये देखील धाव घेतल्याचं रिपोर्टकडून समजतंय.
सलमानच्या घराबाहेर झालेल्या फायरिंगनंतर त्याने सिक्युरिटीचा कडक बंदोबस्त केला आहे. त्यामुळे सलीम खान यांना थेट बाहेर गाठून ही धमकी देण्यात आली आहे. या थरारक घटना घडवून आणणाऱ्या दोन आरोपींचा फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रिपोर्टनुसार वायरल झालेल्या फोटोमध्ये एक स्त्री आणि एक पुरुष पाहायला मिळत आहेत. यामध्ये पुरुष स्कुटी चालवत आहे तर, त्याच्या मागे बसलेल्या महिलेने बुरखा घातलेला आहे. यामध्ये तिचा चेहरा पूर्णपणे झाकलेला पाहायला मिळतोय.
अशी मिळाली सलीम खान यांना धमकी :
माध्यमांच्या माहितीनुसार सलीम खान मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर निघाले होते. तेव्हा त्यांना ही भयानक धमकी देण्यात आली. वॉक करत असताना सलीम खान एका बेंचवर रिलॅक्स होण्यासाठी बसले होते. त्यादरम्यान गॅलेक्सीकडून बँडस्टँडकडे एक कपल स्कुटीवरून जात होते.
माध्यमांच्या रिपोर्टनुसार स्कुटीने पुन्हा यूटर्न घेतलाआणि सलीम खान यांच्याजवळ येऊन महिला म्हणाली,’ लॉरेंस बिश्नोई को भेजू क्या?’. असं बोलून झाल्यानंतर दोघेही स्कुटीवरून सुसाट पुढे निघून गेले. दोघांच्या स्कुटीचा नंबर 7444 असा असल्याची माहिती देखील समोर आली आहे. त्याचबरोबर सदर घटनेला घाबरून सलीम यांनी थेट पोलिसांकडे धाव घेतली असून पोलिसांकडून या घटनेची तपासणी सुरू आहे. रिपोर्टकडून असं देखील समजतय की ही घटना 18 सप्टेंबरला घडली आहे.
खूप आधीपासूनच सलमानच्या जीवावर उठलाय गॅंगस्टर बिश्नोई :
गॅंगस्टर लॉरेंस बिश्नोई हा अनेक वर्षांपासून सलमानच्या जीवावर उठला आहे. सलमानच्या काळवीट मारण्याच्या प्रकरणातून बिश्नोइ समुदाय सलमानवर प्रचंड नाराज आहे. गँगस्टरने दिवसाढवळ्या आणि एका इंटरव्यूमध्ये सलमान खानला धमकी दिली होती. यामध्ये सलमानने माफी मागावी किंवा शिक्षा भोगायला तयार राहावं अशा पद्धतीचे वक्तव्य लॉरेंसने केलं होतं. अजून या प्रकरणाबद्दल काही अपडेट समोर आली नाहीये. त्यामुळे आता पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी सलमानचे चाहते उत्सुक आहेत.
Latest Marathi News | Salman Khan Father Salim Khan Gets Threats Again From Bishnoi Gang 20 September 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- CIBIL Score | सिबिल स्कोर 500 हून खाली घसरला असेल तर चिंता नको, या 5 गोष्टी वापरून वाढवता येईल - Marathi News
- Bigg Boss Marathi | पॅडी दादांनी स्पष्टच सांगितलं, अभिजीत म्हणजे अरबाजचं सॉफ्ट व्हर्जन - Marathi News
- Jio Recharge | 449 रुपयात दररोज मिळणार 3GB डेटा, जिओच्या या रिचार्ज प्लॅनबद्दल जाणून घ्या - Marathi News
- NBCC Share Price | NBCC स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, शेअर खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 481% परतावा - Marathi News
- Post Office Scheme | महिलांनो, 2 वर्षांच्या गुंतवणुकीवर केवळ व्याजानेच कमवाल 32,044 रुपये, फायदा घ्या - Marathi News
- Bigg Boss Marathi | घराबाहेर पडताना पंढरीनाथ यांनी घेतला मोठा निर्णय, सुरजला अश्रू अनावर, वाचा सविस्तर - Marathi News
- Home Loan EMI | गृहकर्जाचा डोंगर हलका करायचा असेल तर, या 9 स्टेप्स फॉलो करा, EMI सुद्धा होईल कमी - Marathi News
- Post Office Scheme | 10 लाखांचे 30 लाख होतील, बेस्ट ठरेल एक्सटेंड रूल, जाणून घ्या पोस्टाच्या या योजनेबद्दल - Marathi News
- Personal Loan EMI | पर्सनल लोनवरील EMI आणि व्याजाच्या टेन्शनमधून व्हाल मुक्त, वापरा ही भन्नाट ट्रिक - Marathi News
- Bigg Boss Marathi | 'हे अरबाजचे कपडे आहेत फेकून द्या', निक्कीला मिळाला गुलिगत धोका, आई म्हणाली.. - Marathi News