10 June 2023 6:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Video Viral | शिंदे पुत्र श्रीकांत शिंदेंचा राजकीय गेम भाजपकडून निश्चित, आधीच स्किप्टेड राजकीय रडगाण्याचे व्हिडिओ शेअर करण्यास सुरुवात? El-Nino Warning | अल निनो मुळे पॅसिफिक महासागर तापत आहे, जारी केला इशारा, भारतावर काय परिणाम होईल? Loksabha Election | भाजपमध्ये पडद्याआड हालचाली वाढल्या, लोकसभा निवडणूक 2023 मध्येच घेण्याची तयारी? मोदी-शहांची चिंता का वाढतेय? Numerology Horoscope | 10 जून 2023 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | आजचे राशिभविष्य | 10 जून 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | मल्टिबॅगर शेअर्सची यादी सेव्ह करा! 2 महिन्यांत 173 टक्क्यांपर्यंत परतावा देतं आहेत, जोरदार कमाई होईल Maan Aluminium Share Price | गुंतवणूकदार मालामाल! मान ॲल्युमिनियम शेअरने 1 लाखावर दिला 13 लाख परतावा, प्लस फ्री बोनस शेअर्स
x

VIDEO | करण जोहरच्या घरी पार्टीत ड्रग्सचा वापर नाही | ती पांढरी रेष ड्रग्स नव्हे मग काय होतं?...वाचा

No drugs, Karan Johar home party, forensic science laboratory report

नवी दिल्ली, २६ ऑक्टोबर : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर बॉलिवूड इंडस्ट्रीतील नेपोटिज्मसोबत ड्रग्सवरूनही अनेक गंभीर आरोप झाले होते. अशातच २०१९ मध्ये करण जोहरच्या घरी झालेल्या एका पार्टीचा व्हिडीओ चर्चेत आला होता. हा व्हिडीओ पाहून आरोप लावण्यात आले होते की, व्हिडीओत असलेले सगळे स्टार ड्रग्सच्या नशेत आहेत आणि या पार्टीत ड्रग्सचा वापर झाला होता. पण आता एका फॉरेन्सिक रिपोर्टने हे आरोप फेटाळून लावले आहेत.

एनडीटीव्हीच्या एका रिपोर्टनुसार, फॉरेन्सिक सायन्स लेबॉरेटरी्या अधिकाऱ्यांनी करण जोहरच्या या पार्टीच्या व्हिडीओला क्लीन चीट दिली आहे. सोबतच सांगितले की, या पार्टीत कोणत्याही प्रकारच्या ड्रगचा वापर करण्यात आलेला नाही. यात ड्रग दिसून येत नाहीये. व्हिडीओत एके ठिकाणी पांढरी लाइन दिसत आहे. ज्यावरून दावा करण्यात आला होता की, ती ड्रगची लाइन आहे. मात्र, फॉरेन्सिक तपास टीमने सांगितले की, ती ड्रग्सची लाइन नसून केवळ एका ट्यूबलाइटची सावली आहे.

 

View this post on Instagram

 

Saturday night vibes

A post shared by Karan Johar (@karanjohar) on

दरम्यान, सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून कमालीच्या आक्रमक झालेल्या आणि बॉलिवूडमधील नेपोटिझम आणि ड्र्रग्स रॅकेटवर टीका करणाऱ्या कंगना राणौत हिने बॉलिवूडला टीकेचे लक्ष्य केले होते. बॉलिवूड इंडस्ट्री ही ड्रग्स, नेपोटिझम आणि शोषणाचे गटार झाले आहे, अशी टीका कंगनाने केली होती.

त्यानंतर कंगनासहित बेजबाबदार बातम्या देणाऱ्या मीडिया हाऊसेस विरोधात शाहरुख, सलमान आणि आमिर खान यांच्या प्रॉडक्शन हाऊसेससह ३८ जणांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. रिपब्लिक टीव्ही, टाइम्स नाऊ, अर्णब गोस्वामी, प्रदीप भंडारी, राहुल शिवशंकर, नविका कुमार यांच्या विरोधात खान मंडळींच्या प्रॉडक्शन हाऊससेससह ३४ प्रॉडक्शन हाऊसेसनी याचिका दाखल केली आहे.

गेल्या दोन महिन्यात बॉलिवूडची प्रतिमा मलीन करण्याचं काम या सगळ्यांनी केल्याची तक्रार या याचिकेत करण्यात आली आहे. या सगळ्यांविरोधात या प्रॉडक्शन हाऊसेसनी बेजबाबदार बातमीदारीचा ठपका ठेवला आहे.

 

News English Summary: Now, the latest update on the viral video is, that the Forensic Science Laboratory (FSL) has given clean chit to Karan Johar as they didn’t find any evidence of actors consuming drugs. As per the report in NDTV, ‘the white line seen in the video is just a bare reflection of the tube light. The FSL has also claimed that no drugs and narcotic substances were found at the filmmaker’s party by inspecting the video.

News English Title: No drugs was consumed during Karan Johar home party says forensic science laboratory report News Updates.

हॅशटॅग्स

Bollywood(88)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x