18 June 2021 2:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
मोदींच्या लोकप्रियतेत घट | देशाची लोकसंख्या १२५ कोटी | फक्त २१२६ भारतीयांनी ठरवलं मोदी जगात लोकप्रिय केंद्राकडून ओबीसींचा इम्पिरिकल डेटा मिळवण्यासाठी सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार BHR घोटाळा | गिरीश महाजन समर्थकांवर काल कारवाई झाल्यानंतर नाथाभाऊंनी शरद पवारांची भेट घेतली रुग्नाला १ केळ द्यायला ढीगभर भाजप-RSS कार्यकर्ते उपक्रम | अन भातखळकरांची काँग्रेसच्या त्या उपक्रमावर टीका मुंबईकरांनो मुलांची काळजी घ्या | ब्लॅक फंगसमुळे ३ मुलांवर शस्त्रक्रिया | डोळे काढावे लागले अमेरिका | कोरोना लसीनंतर आता कोविड-19 च्या टॅबलेट तयार करणार | संशोधनासाठी 3 अब्ज डॉलर्सचा निधी पालक आणि विद्यार्थ्यांसाठी खुशखबर | आता शाळा सोडल्याच्या दाखल्याशिवाय दुसऱ्या शाळेत प्रवेश घेता येणार
x

द्वेषयुक्त भाषण | भाजपा आमदाराच्या फेसबुक इन्स्टाग्राम अकाऊंटवर बंदी

Facebook, Bans BJP MLA T Raja Singh, Hate Speech, Marathi News ABP Maza

अमरावती, ३ सप्टेंबर : देशात विरोधी पक्षाकडून फेसबुकवर प्रक्षोभक भाषणांना प्रोत्साहन देत असल्याचा आरोप केला जात होता. या दरम्यान फेसबुकने भाजप नेते टी राजा सिंह यांच्यावर हिंसा आणि द्वेषाला प्रोत्साहन देणाऱ्या पोस्ट केल्याप्रकरणी कारवाई केली आहे. फेसबुकने टी राजा सिंह यांच्यावर फेसबुकच्या नियमांचे उल्लंघन केल्याने फेसबुक, इन्स्टाग्राम या अकाऊंटवर बंदी आणली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

भाजपा नेत्याच्या द्वेषयुक्त भाषणावरून ‘फेसबुक’ने हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत असल्याचं ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने प्रसिद्ध केल्यानंतर देशात राजकीय वादंग निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर फेसबुकने ज्या भाजपा आमदाराच्या पोस्टवरून वादाला तोंड फुटलं, त्यांच्यावर कारवाई केली आहे. तेलंगणाचे भाजपा आमदार राजा सिंह यांच्यावर फेसबुककडून कारवाई करण्यात आली आहे. राजा सिंह यांच फेसबुक अकाउंटही बंद करण्यात आलं आहे.

वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्ट आल्यानंतर बुधवारी संसदीय समितीने फेसबुक प्रतिनिधींना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा गैरवापर केल्याचा आरोप करत आपली बाजू मांडण्यास सांगितले. त्याचबरोबर मंगळवारी माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनीही फेसबुकचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांना पत्र लिहून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील कर्मचार्‍यांवर निवडणुकीत लोकांना मदत केल्याचा आरोप केला आहे.

 

News English Summary: Facebook, under pressure for weeks over its handling of hate speech, on Thursday banned BJP MLA T Raja Singh from its platform and Instagram for violating its policy around content promoting violence and hate.

News English Title: Social Media site Bans BJP MLA T Raja Singh In Report That Sparked Hate Speech Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#facebook(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x