2 May 2025 3:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
x

Hairstyle Fashion | सुंदर आणि उठून दिसण्यासाठी कलर्स केसांना स्टायलिश लुक द्या, टिप्स फॉलो करा

colored hair

Hairstyle | सर्व महिलांना सुंदर दिसायला आवडते, त्यासाठी त्या पार्लर अथवा घरगुती उपाय करतात. वेगवेगळ्या पारंपारिक पद्धतीने साडी नेसने असो वा ब्यूटी टिप्स असो. बऱ्याचश्या महिला सोशल मीडियावरील काही लेटेस्ट ट्रेंडही फॉलो करतात. दरम्यान, लग्नाचा मोसमही जवळपास जवळ आला आहे. तसेच रोज बाजारामध्ये ब्यूटी संदर्भात काहीना काही नवीन वस्तू पाहायला मिळतात.

घरगुती कार्यक्रमांमध्ये अथवा पार्टीमध्ये, किंवा समारंभामध्ये व इतर कार्यक्रमामध्ये सुंदर व उठून दिसण्यासाठी महिला आपल्या केसांवर वेगवेगळे प्रयोग करत असतात. ट्रेंड फॉलो केला तर, तुमच्या लक्षात येईल की आत्ता रंगीत केसांची खूप फॅशन आहे. रंगीत केसांमध्ये बनवलेली केशरचना सध्या ट्रेंडमध्ये आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, रंगीत केस असतील तर त्यासाठी कोणती व कशी हेअरस्टाईल करावी,जेणेकरून तुमचा स्टायलिश लुक आणखीण निखरून निघेल. तर चला याबाबत आणखी माहिती घेऊ.

लो मेसी बन हेयर स्टाइल
कार्यक्रमामध्ये जेव्हा तुम्हाला तुमच्या केसांची कोणती हेअरस्टाईल करायची ते समजत नसेल तेव्हा तुम्ही लो स्टाइल बन हेअरस्टाइल करू शकता. तुमचे रंगीबेरंगी केस आणि लो बन हेअरस्टाइल हे तुम्हालाही स्टायलिश लुक देतात. जेव्हा तुम्ही लेहंगा परिधान करता तेव्हा त्यावर या प्रकारचा बन ट्राय करू शकता. यासाठी तुम्हाला बनावट पफ देखील लागेल आणि कोणत्याही लग्नासाठी किंवा फंक्शनसाठी तुम्ही असा बन वापरून पाहू शकता तसेत पुढच्या भागात तुम्ही तुमच्यानुसार स्टायलिंग करू शकता.

फ्लॉवर बन हेयर स्टाइल
दरम्यान, तुम्ही फ्लॉवर बन हेयर स्टाइल कोणत्याही कार्यक्रमामध्ये करू शकता जेणेकरून तुमचा लुक अधिकच स्टायलिश होईल आणि आकर्षक दिसेल. फ्लॉवर बन हेयर स्टाइल ही तुमच्या हायलाइट केसांना उठून दिसण्यास मदत करतात. शिवाय, तुम्ही या हेअर स्टाईलचा उपयोग पारंपारिक पोशाखासोबत करू शकता. केसांना व तुमच्या लुकला आणखी सुंदर बनवण्यासाठी तुम्ही फुलांचाही वापर करू शकता. या प्रकारचा बन सहज बनवण्यासाठी तुम्ही हेअर कर्लर देखील वापरू शकता.

फ्रेंच बन केशरचना
या प्रकारचा अंबाडा बघायला खूप क्लासी वाटतो तसेच तुम्हाला काहीतरी अनोखं ट्राय करायचं असेल, तर तुम्ही असा बन देखील वापरून पाहू शकता. साडी असो किंवा लेहेंगा, तुम्ही कोणत्याही प्रकारच्या पारंपारिक पोशाखासोबत या प्रकारची बन केशरचना करू शकता. तुम्ही फ्रंटसाठी साइड पार्टिंग करू शकता तर तसेच तुम्ही लेयर्समध्ये साइड पार्टिंग सेट करू शकता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Do this stylish look for colored hair Checks details 25 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

colored hair(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या