3 May 2025 2:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

Homemade Scrub For Face | साखरेने चेहरा होईल चमकदार व निरोगी, घरीच करा शुगर स्क्रब, या टिप्स फॉलो करा

Homemade Scrub For Face

Homemade Scrub For Face | आपली त्वचा सुंदर व चमकदार दिसण्यासाठी महिला वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करतात. तसेच स्क्रबचा देखील पर्याय निवडतात पण त्याचे आपल्या त्वचेला तोटे सुद्धा होतात तर आज मी तुम्हाला घरगुती पद्धतीने कसे स्क्रब बनवायचे ते सांगणार आहे. स्क्रबिंगमुळे त्वचेवरील धूळ, घाण, तेल, घाम निघून जातो आणि त्वचा स्वच्छ दिसायला लागते. तसेच स्क्रब केल्याने चेहरा चमकदार दिसू लागतो. स्क्रबमध्ये असलेले मॉइश्चरायझिंग घटक त्वचेला हायड्रेट करण्याचे काम करतात, आणि ज्यामुळे त्वचेला चमक येते, स्क्रबिंग केल्याने चेहऱ्यावर वाढत्या वयाचा प्रभाव कमी दिसतो आणि तुमचे वय दिसून येत नाही. आठवड्यातून एकदा स्क्रब केल्याने त्वचा स्वच्छ व निरोगी राहते. स्क्रबिंगसाठी केमिकल बेस उत्पादने वापरण्याऐवजी, घरगुती वस्तूंपासून बनलेले उत्पादन अधिक प्रभावी ठरते तसेच घरगुती स्क्रबने त्वचेवर कोणतेही दुष्परिणाम होण्याचा धोका नाहीये तसेच शुगर स्क्रब हा चेहरा स्क्रब करण्यासाठी सर्वोत्कृष्ट आहे जो सर्व प्रकारच्या त्वचेला शोभून दिसतो आणि जर तुमच्या चेहऱ्यावर पुरळ असेल तर तुम्ही शुगर स्क्रब वापरू शकता. घरीच साखरेचा स्क्रब कसा तयार करायचा ते जाणून घेऊयात.

साखरेच्या स्क्रबचे फायदे:
साखरेमध्ये असलेले मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि लोह त्वचेला हवे असलेले घटक देतात आणि त्वचेचे पोषण करतात. साखर त्वचेतील मृत पेशी काढून टाकून त्वचेची छिद्रे स्वच्छ करण्यास मदत करते तसेच साखर स्क्रब केल्याने पुरळ, बारीक रेषा आणि तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात. आठवड्यातून एकदा शुगर स्क्रब केल्याने चेहऱ्यावरील प्रदूषण आणि धुळीचे परिणाम दूर होऊ लागतात.

शुगर स्क्रब कसा बनवायचा:
1. शुगर स्क्रब बनवण्यासाठी सर्वप्रथम 2 चमचे साखर, अर्धा चमचा मध आणि त्यामध्ये एका लिंबाचा रस घ्या.
2. तिन्ही गोष्टी नीट मिसळून घ्या त्यानंतर पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हातांनी मसाज करा.
3. लक्षात ठेवा की, साखरेच्या स्क्रबने फक्त पाच मिनिटे मसाज केल्यानंतर चेहरा धुवा. चेहरा थंड पाण्याने धुवा म्हणजे त्वचा आतून थंड राहील.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Homemade Scrub For Face to look beautiful checks details 16 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Homemade Scrub For Face(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या