27 July 2024 10:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | सरकारी योजनेत फायदाच फायदा! 95 रुपयांच्या बचतीवर मिळतील 14 लाख रुपये, संधी सोडू नका Reliance Power Share Price | कर्जमुक्त कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर 'पॉवर' दाखवणार, 29 रुपयांचा शेअर खरेदीला गर्दी Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा HFCL Share Price | 5G संबंधित HFCL सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा
x

Face Serum Benefits | फॅशनेबल राहण्यासाठी अनेकजणी त्वचेची काळजी घेण्यासाठी फेस सीरम वापरतात, मात्र 'हे' नेहमी लक्षात ठेवा

Face Serum Benefits

Face Serum Benefits | आपण दिवस रात्र कुठेही फिरत असतो. मात्र यावेळी चेहऱ्याची काळजी घेणे फार महत्वाचे आहे. ऊन, धूळ, प्रदूषण, बाहेरील खराब खाणे आणि जीवनशैलीचा परिणाम केवळ आपल्या आरोग्यावरच नाही तर त्वचेवरही दिसून येतो. सूर्यप्रकाशाच्या जास्त संपर्कामध्ये आल्याने केवळ त्वचा टॅनिंग होत नाही तर वृद्धत्व देखील लवकर दिसू लागते. शांत झोप न लागणे किंवा जास्त ताण हे देखील अकाली वृद्धापकाळाला बोलावण्याचे काम करतात. पिंपल्स, सुरकुत्यांसोबतच काळी वर्तुळेही आपल्या सौंदर्यात डाग पडण्याचे काम करतात. तर अशा परिस्थितीत, एक असा उपाय आहे, जो या सर्व समस्यांपासून आपल्याला आराम देऊ शकतो, तो म्हणजे फेस सीरमचा वापर करणे.

फेस सीरम म्हणजे काय :
कोणत्याही परिस्थितीमध्ये चेहऱ्याची काळजी घेणे हे महत्वाचे आहे. तर सीरम हा एक प्रकारचा हलका वजनाचा मॉइश्चरायझर आहे जो आपल्या चेहऱ्यासाठी खुप फायदेशीर आहे. फेस सीरम प्रदूषण आणि रसायनयुक्त सौंदर्य उत्पादनांमुळे आपली खराब झालेली त्वचा दुरुस्त करण्याचे काम करते. योग्य पद्धत आणि या मॉइश्चरायझरचा सतत वापर केल्याने चेहऱ्याची चमक वाढते आणि वृद्धत्वाचा प्रभाव देखील कमी होतो.

सीरम कसे वापरावे :
1. सर्वांत आधी चांगल्या फेसवॉशने चेहरा स्वच्छ करा.
2. ओल्या चेहऱ्यावर फेस सीरमचे दोन ते तीन थेंब घेऊन हलक्या हातांनी मसाज करावा आणि ते चेहऱ्यावर घासणार नाही याची काळजी घ्यावी.
3. शेवटी मॉइश्चरायझर लावा, जे त्वचेला हायड्रेट, उजळ आणि इतर अनेक फायद्यांसाठी आवश्यक आहे.

फेस सीरम लावण्याचे फायदे
1. फेस सीरम चेहऱ्याची चमक वाढवते त्यामुळे व्हिटॅमिन सी असलेले फेस सीरम निवडा.
2. फेस सीरम त्वचेच्या दुरुस्तीसाठी काम करते तसेच रसायनयुक्त सौंदर्य उत्पादनांच्या वापरामुळे त्वचेचे नुकसान होते. तुमच्या चेहऱ्यावर वेळेपूर्वी सुरकुत्या दिसत असतील तर त्यांनी रोखण्यासाठी फेस सीरम खूप फायदेशीर आहे.
3. तुमच्या चेहऱ्यावर मुरुमांच्या समस्येने हैराण केले आहे, त्यामुळे यासाठीही फेस सीरम प्रभावी आहे. हे उघडे छिद्र बंद करते आणि चेहऱ्याचा घट्टपणा राखतो.

फेस सीरम लावताना या गोष्टी लक्षात ठेवा :
1. फेस सीरम लावल्यानंतर चेहऱ्याला सनस्क्रीन लावा.
2. सीरमचे थेंब मर्यादित प्रमाणातच वापरा जास्त प्रमाणात सीरम वापरल्याने देखील त्वचेचे नुकसान होऊ शकते.
3. फेस सीरम लावल्यानंतर खूप वेगाने चेहऱ्याला मसाज करण्याची चूक करू नका.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Face Serum Benefits Checks details 24 September 2022.

हॅशटॅग्स

Face Serum Benefits(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x