21 March 2023 1:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rail Vikas Nigam Share Price | या सरकारी कंपनीचा शेअर 65 रुपयांचा, शेअर्स खूप तेजीत, हा स्टॉकची खरेदी वाढण्याचं कारण? Godawari Power and ISPAT Share Price | ही कंपनी शेअर बायबॅक करणार, रेकॉर्ड तारीख आणि बायबॅक दर पाहून पैसे लावा Viral Video | काळजाचा ठोका चुकला! सिनेमाप्रमाणे घडलं, ती समुद्रात उडी मारणार इतक्यात टायगर शार्क आला आणि...? Children Mobile Addiction | मोबाइलचे व्यसन मुलांसाठी खूप धोकादायक, फॉलो करा या टिप्स, मुले स्वत: सोडून देतील मोबाईल Smart Metering Transition | उन्हाळ्यात वीज बिल कमी होईल, केंद्र सरकारने सांगितली पद्धत, त्यासाठी हे आजच करा SBI Bank Account Alert | एबीआय बँक ग्राहकांना महत्वाचा अलर्ट, तुमच्या खात्यातूनही पैसे कापले गेले असतील पहा, किती रक्कम? IRCTC Railway Confirm Ticket | कन्फर्म तिकीटाशिवाय ट्रेनमध्ये प्रवास कसा करावा? अडचणीच्या वेळी हा नियम लक्षात ठेवा
x

Numerology Horoscope | 25 सप्टेंबर, रविवारसाठी तुमचा लकी नंबर आणि काय सांगतं तुमचं अंकज्योतिष शास्त्र

Numerology Horoscope

Numerology Horoscope | अंकशास्त्राच्या गणनेत व्यक्तीचा मूलांक म्हणजे त्या व्यक्तीच्या तारखेची बेरीज होय. उदा., २३ एप्रिल रोजी एखाद्या व्यक्तीचा जन्म झाल्यास त्याच्या जन्मतारखेच्या अंकांची बेरीज २+३=५ अशी होते. म्हणजेच ५ ला त्या व्यक्तीचा मूलांक असे म्हटले जाईल. जर एखाद्याची जन्मतारीख दोन अंकी म्हणजेच 11 असेल तर त्याचा मूलांक 1+1= 2 असेल. त्याचबरोबर जन्मतारीख, जन्म महिना व जन्मवर्ष या एकूण योगास भाग्यशाली संख्या असे म्हणतात. उदा., २२.०४.१९९६ रोजी जर कोणाचा जन्म झाला असेल, तर या सर्व संख्यांच्या बेरजेला भाग्यांक म्हणतात. 2+2+0+4+1+9+9+6=33=6 म्हणजेच त्याचा लकी नंबर 6 आहे.

अंक 1 :
आज तुमचा दिवस व्यस्ततेने भरलेला असेल. क्षेत्र आणि व्यवसायात नव्या योजनांवर काम सुरू करता येईल. महत्त्वाच्या व्यक्तींना भेटता येईल. नोकरी-व्यवसायाच्या क्षेत्रात नातेसंबंधांचा फायदा होईल. जोखमीच्या बाबतीत अनुभवी व्यक्तीचा सल्ला नक्की घ्या. परिवाराचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळू शकेल. आपले आरोग्य सामान्य राहील.
* लकी नंबर- 25
* शुभ रंग- सिल्वर

अंक 2 :
आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा असेल. कार्यक्षेत्रातील व व्यवसायातील वातावरण अनुकूल राहील. सहकाऱ्यांचे सहकार्य व अधिकाऱ्यांची साथ मिळेल. नव्या योजनांवर काम सुरू करता येईल. भावुकतेमुळे महत्त्वाच्या बाबतीत निर्णय घेऊ नका. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. जुन्या मित्रांची भेट संभवते. आपले आरोग्य सामान्य राहील.
* लकी नंबर – 31
* शुभ रंग- निळा

अंक 3 :
आज तुमचा दिवस संमिश्र जाईल. क्षेत्र आणि व्यवसायात काळजीपूर्वक काम करा. महत्त्वाच्या बाबींचा विचार करून निर्णय घ्या. विरोधक सक्रिय होऊ शकतात. आर्थिक बाबतीत सावधानता बाळगा. बदलाच्या संधी मिळू शकतील. कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मानसिक ताण तुम्हाला त्रास देऊ शकतो. वाहने व यंत्रसामुग्रीच्या वापरात सावधानता बाळगावी.
* लकी नंबर- 29
* शुभ रंग- हिरवा

अंक ४ :
आजचा आपला दिवस कर्तृत्वाने भरलेला असेल. सर्जनशील कार्यात आपली रुची वाढेल. तुम्ही सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण असाल. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. कार्यक्षेत्रात नव्या जबाबदाऱ्या मिळू शकतील. परिवाराचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. कला आणि संगीताची आवड वाढेल. मुलाच्या बाजूने चांगली बातमी मिळू शकते. कुटुंबासोबत सहलीला जाण्याची योजना आखू शकता.
* लकी नंबर- 33
* शुभ रंग- तपकिरी

अंक 5 :
आज तुमचा दिवस सामान्य असेल. कार्यक्षेत्रातील व व्यवसायातील वातावरण कमी अनुकूल राहील. नव्या योजनांवर काम सुरू करू नका. व्यवसायात लाभाच्या संधी निर्माण होतील, परंतु व्यावसायिक स्पर्धेपासून दूर राहा. धार्मिक कार्यात आपली रुची वाढेल. कुटुंबात धार्मिक कार्यक्रम घेता येतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. हवामानातील बदलाचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो.
* लकी नंबर- 27
* शुभ रंग- नारंगी

अंक ६ :
आज तुमचा दिवस संमिश्र जाईल. कामाच्या ठिकाणी व व्यवसायातील वातावरण आपणास कमी अनुकूल राहील. नव्या योजनांवर काम सुरू करू नका. महत्त्वाच्या बाबतीत निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्या. व्यवसायात लाभाच्या संधी निर्माण होतील, परंतु स्पर्धेच्या परिस्थितीपासून दूर राहा. मनात भविष्याबद्दल चिंता निर्माण होऊ शकते. परिवाराचे सहकार्य मिळेल. पोटाचे आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात.
* लकी नंबर- 35
* शुभ रंग- ग्रे

अंक 7 :
आजचा तुमचा दिवस संधींनी भरलेला असेल. कार्यक्षेत्रात व व्यवसायात नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतील. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. तुम्ही उत्साहाने परिपूर्ण व्हाल. विरोधकांवर विजय मिळेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. परिवाराचे सहकार्य मिळेल. मुलाच्या बाजूने चांगली बातमी मिळू शकते. बेरोजगारांना रोजगाराच्या संधी मिळू शकतात. आपले आरोग्य सामान्य राहील.
* लकी नंबर- 12
* शुभ रंग- पिवळा

अंक 8 :
आज तुमचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. नोकरी-व्यवसायात सावधानता बाळगा. धोकादायक प्रकरणांतील निर्णय सध्या तरी पुढे ढकला. व्यवसायात नफ्याच्या संधी कमी होतील. विरोधकांपासून सावध राहा. कोणत्याही कामात घाई करू नका. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. आपल्या वागण्यात सौम्यता ठेवा. कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. तब्येतीचीही काळजी घ्या.
* लकी नंबर- 23
* शुभ रंग- सोनेरी

अंक ९ :
आज काम आणि व्यवसायाच्या क्षेत्रात काळजीपूर्वक काम करा. आज आपला दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. नव्या योजनांवर काम सुरू करू नका. विरोधक सक्रिय होऊ शकतात. महत्त्वाच्या बाबतीत निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्या. व्यवसायात नफ्याच्या संधी कमी होतील. व्यावसायिक स्पर्धेपासून दूर राहा. कुटुंबात वाद होऊ शकतो. मानसिक ताण तुम्हाला त्रास देऊ शकतो. वाहन वापरताना सावधानता बाळगावी.
* लकी नंबर – 21
* शुभ रंग- केसरी

News Title: Numerology Horoscope predictions for these peoples check details 25 September 2022.

हॅशटॅग्स

#Numerology Horoscope(231)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x