8 September 2024 2:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | तुमची पत्नी घरबसल्या कमवू शकते 5 लाख; मंथली इनकम स्कीम ठरेल फायद्याची Business Idea | बेकरी व्यवसाय करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी! या तरुणीने उभारला मोठ्या उद्योग, तुमची सुद्धा सुरु करा HDFC Mutual Fund | पालकांनो! तुमच्या मुलांसाठी खास योजना, महिना रु.5000 बचतीवर 1.37 कोटी परतावा मिळेल Smart Investment | होय! 15x15x15 या श्रीमंतीच्या फॉर्म्युल्याने बचत करा, दरमहा मिळतील 1 लाख रुपये - Marathi News My EPF Money | नोकरदारांनो खुशखबर आली! EPF खात्यात जमा होणार 2.35 कोटी रूपये; फायद्याची अपडेट - Marathi News SBI Mutual Fund | पगारदारांनो! डोळे झाकुन या SBI फंडात बचत करा, दर वर्षी 77% पर्यंत परतावा मिळेल - Marathi News Post Office Insurance | सामान्य लोकांसाठी पोस्ट ऑफिसची ढासू स्कीम; 10 लाखांचा विमा फक्त 555 रुपयांत - Marathi News
x

Niacinamide Serum | चेहऱ्यावरील काळे डाग गायब करेल एलोवेरा आणि ग्रीन टीपासून बनलेलं हे सिरम, एकदा वापरून पहाच

Niacinamide Serum

Niacinamide Serum | अनेक महिला चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी विविध प्रकारचे प्रॉडक्ट वापरत असतात. चेहऱ्याचा पोत चांगला राहावा, चेहरा कायम टवटवीत दिसावा सोबतच चेहरा ब्राईट (Vitamin C Serum) होऊन काळे डाग निघून जावे यासाठी बऱ्याच महिला वेगवेगळ्या प्रकारचे फेस सिरम देखील ट्राय करतात. बाजारात मिळणारे हे सिरम महागडे असते. जे प्रत्येकालाच परवडत नाही.

आज आम्ही तुमच्यासाठी कमी पैशांमध्ये आणि घरच्या घरी बनवता येणारे एलोवेरा, ग्रीन टी सीरम घेऊन आलो आहोत. या सिरममुळे तुमचा चेहरा अतिशय ब्राईट होईल. सोबतच काळे, भुरके आणि राखाडी डाग निघून जातील.

हे सिरम तयार करण्यासाठी तुम्हाला दोन चमचे एलोवेरा जेल आणि ग्रीन टीचे पाणी लागेल. ग्रीन टीचे पाणी तयार करण्यासाठी दोन ते तीन ग्रीन टी बॅग एक ग्लास पाण्यामध्ये भिजत ठेवा. हे पाणी गांधीच्या साह्याने गाळून घ्या. त्यानंतर एका स्प्रे बॉटलमध्ये भरून त्यामध्ये एलोवेरा जेल मिक्स करा. बॉटल चांगली शेक करून मिश्रण एकजीव करून घ्या. तुमचं होममेड सिरम तयार आहे.

तुम्ही हे सिरम रात्री झोपताना चेहऱ्याला लावू शकता. तत्पूर्वी चेहरा फेस वॉशने स्वच्छ धुऊन घ्या आणि मगच सिरम अप्लाय करा. सिरम स्प्रे करताना बॉटल शेक करून घ्या जेणेकरून एलोवेरा जेल आणि ग्रीन टीचे मिश्रण एकत्र होऊन चेहऱ्यावर पडेल.

एलोवेरा जेलमुळे तुमचा चेहरा एक्सपोलिएट होईल. एलोवेरा जेलमध्ये अँटिबॅक्टरियल प्रॉपर्टीज असल्यामुळे पिंपल्स आणि काळ्या डागांसह चिकटपणा देखील दूर निघून जाईल. चेहऱ्यावर सिरम स्प्रे केल्याबरोबर तुम्हाला एक फ्रेश लुक प्राप्त होईल.

News Title : Niacinamide Serum for Face Skin Flavor of Aloe Vera and Green Tea 04 September 2024.

हॅशटॅग्स

#Niacinamide Serum(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x