मुंबई : आधुनिक तंत्रज्ञानाचा एक नवा चमत्कार घेऊन स्मार्टफोन इंडस्ट्री मधील टेक्नो-जायंट मानली जाणारी सॅमसंग कंपनी हि आपल्या ग्राहकांसाठी घेऊन आली आहे जगातील सर्वात पहिला फोन ज्याचा कॅमेरा फिरता आहे. सॅमसंग गॅलॅक्सि A80 असं ह्या स्मरफोनचं नाव असून हा फोन भारतात नुकताच लाँच झाला आहे.

ह्या फोनचा सर्वात मोठा वैशिष्ठ म्हणजे ह्याचा फिरता ट्रिपल-कॅमेरा. ह्या ट्रिपल कॅमेरा मधील प्रमुख कॅमेरा हा अत्याधुनिक असा 48 मेगापिक्सेलचा आहे व दुसरा कॅमेरा 8 मेगापिक्सेलचा असून वाईड शॉट कैद करण्यासाठी आहे व तिसरा कॅमेरा डेप्थ सेन्सर सहित आहे. ह्या स्मार्टफोन ची स्क्रीन (17.03 सेंटीमीटर) 6.7 ची असून त्याचं डिस्प्ले पूर्णतः एचडी आहे आणि एमोलेड इंफिनिटी डिस्प्ले सहित. बॅटरी च्या बाबतीत सुद्धा A80 कुठेही मागे नाही, याची 3700Mah ची बॅटरी फास्ट चार्जिंग सी-टाईप केबल सोबत अगदी अर्ध्या तासात ह्या फोनला फुल्ल चार्ज करते.

सध्या सॅमसंग फोन्स मध्ये प्रचिलीत असणारं पायमेन्ट एप्लिकेशन म्हणजेच सॅमसंग-पे सुद्धा ह्या फोन मध्ये इन्स्टॉल्ड आहे. ऑन-स्क्रीन फिंगरप्रिंट सह हा फोन बटनलेस स्मार्टफोन्स च्या शर्यतीत पुढाकार घेत आहे. ह्या सुपर स्मार्टफोनचा प्रोसेसर 730G असून ओक्टा-कोर चिप सहित हा फोन ग्राहकांना आकर्षित अशी स्पीड देईल. अँड्रॉईड श्रेणीतील सर्वात लेटेस्ट असणारं अँड्रॉईड पाय आणि सॅमसंगचं लेटेस्ट यूझर इंटरफेस म्हणजेच सॅमसंग वन ह्या स्मार्टफोनला आपल्या सोबतच्या स्पर्धकांना मागे सोडणारे आहे.

हे स्मार्टफोन सिंगल वेरीयन्ट म्हणजेच 8GB रॅम आणि 128GB रोम सह लाँच होणार आहे. हा अप्रतिम स्मार्टफोन फँटम ब्लॅक, घोस्ट व्हाइट आणि एंजल गोल्ड या तीन रंगात उपलब्ध होणार आहे. भारतात १ ऑगस्ट २०१९ रोजी लाँच होणाऱ्या ह्या अनोख्या स्मार्टफोन ची आतुरता सर्वच सॅमसंग प्रेमी युझर्स मध्ये लागलेली आहे.

गॅझेट्स वर्ल्ड: जगातला पहिला फिरता कॅमेरा असणारा फोन