15 December 2024 1:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Lenovo Legion Y70 | लेनोवोने लीजन वाय 70 स्मार्टफोन लाँच केला, 16 जीबी रॅम आणि अनेक फीचर्स जाणून घ्या

Lenovo Legion Y70

Lenovo Legion Y70 | या आठवड्यात जगभरात अनेक स्मार्टफोन लाँच करण्यात आले. बजेट फोनपासून प्रीमियम स्मार्टफोनपर्यंत अनेक उपकरणे आंतरराष्ट्रीय स्तरावर सादर करण्यात आली. त्यापैकी विवो, रियलमी आणि मोटोरोला या काही ब्रँड्सनी या आठवड्यात धुमाकूळ घातला. आता या यादीत चिनी टेक जायंट लिनोव्होचेही नाव जोडले गेले आहे. कंपनीने लेनोवो लीजन वाय ७० आणि लेनोवो झिओक्सिन पॅड प्रो २०२२ अधिकृतरित्या लाँच केले आहे.

लीजन वाय ७० पॉवरफुल स्नॅपड्रॅगन ८+ जेन १ एसओसीसह येतो आणि अँड्रॉइड १२ वर चालतो. या फोनला सध्या चीनमध्ये लाँच करण्यात आले आहे. कंपनीने ८ जीबी + १२८ जीबी, १२ जीबी + २५६ जीबी आणि १६ जीबी + ५१२ जीबी अशा तीन व्हेरिएंटमध्ये फोन सादर केला आहे. याची सुरुवातीची किंमत २९७० युआन (सुमारे ३५ हजार रुपये) पासून सुरू होते. याची विक्री 22 ऑगस्टपासून सुरू होणार आहे.

किंमत :
लेनोवो लीजन वाय ७० ची किंमत ८ जीबी रॅम + १२८ जीबी मॉडेलसाठी अंदाजे ३५,००० रुपये आहे, १२ जीबी रॅम + २५६ जीबीसाठी अंदाजे ४०,००० रुपये आणि टॉप-ऑफ-द-लाइन १६ जीबी रॅम + ५१२ जीबी मॉडेलची किंमत अंदाजे 50,000 रुपये आहे.

स्पेसिफिकेशन्स :
लेनोवोच्या लेटेस्ट डिव्हाइसमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेट-अप देण्यात आला आहे, ज्यात 50 एमपी प्रायमरी कॅमेरा, 13 एमपी सेकंडरी कॅमेरा आणि दुसरा 2 एमपी कॅमेरा आहे. या स्मार्टफोनमध्ये १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेराही देण्यात आला आहे. फोनमध्ये ६८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५,१०० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

अँड्रॉईड 12 ऑपरेटिंग सिस्टम :
फोनमध्ये कंपनी 6.67 इंचाचा फुल एचडी + ओएलईडी डिस्प्ले देत आहे. हा डिस्प्ले HDR10+ आणि डॉल्बी व्हिजन सोबत येतो. प्रोसेसर म्हणून स्नॅपड्रॅगन 8 + जेन 1 चिपसेट यात देण्यात आला आहे. अँड्रॉइड १२ ऑपरेटिंग सिस्टमवर चालते. हेवी गेमिंग दरम्यान फोन गरम होऊ नये यासाठी यात 10 थरांचे बाष्प कूलिंग चेंबर आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Lenovo Legion Y70 smartphone launched check details 19 August 2022.

हॅशटॅग्स

#Lenovo Legion Y70(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x