8 May 2025 6:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Quant Small Cap Fund | पगारदारांनो, बँक FD ने शक्य नाही, या फंडात 5 ते 6 पटीने बचत वाढेल, असे फंड निवडा Horoscope Today | 08 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या IRFC Share Price | आयआरएफसी शेअर्समध्ये तेजी, गुंतवणूकदारांनी खरेदी, महत्वाची अपडेट नोट करा - NSE: IRFC Reliance Power Share Price | स्वस्त शेअरची जोरदार खरेदी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: RPOWER Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 08 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Motors Share Price | तुटून पडले गुंतवणूकदार, टाटा मोटर्स शेअर्स खरेदी करा, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK
x

Oppo Reno Smartphone | ओप्पो रेनो 8 आणि ओप्पो रेनो 8 प्रो या दिवशी भारतात लाँच होणार | किंमत जाणून घ्या

Oppo Reno Smartphone

Oppo Reno Smartphone | ओप्पो रेनो ८ आणि ओप्पो रेनो ८ प्रो च्या लाँचिंगच्या तारखा अखेर समोर आल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या सीरिजबाबत माहिती इंटरनेटवर पसरत असून आता 18 जुलै रोजी संध्याकाळी 6 वाजता भारतात हा फोन लाँच होणार असल्याचं समोर आलं आहे. ओप्पो रेनो 8 ची किंमत यापूर्वीच लीक झाली असून, याच्या बेस व्हेरिएंटची किंमत 30 हजार रुपयांपासून ते 33 हजार रुपयांपर्यंत असू शकते, अशी माहिती समोर आली आहे. ओप्पो रेनो ८ प्रोची किंमत 42,900 ते 46,000 रुपयांदरम्यान असल्याचे सांगितले जात आहे.

फोन फ्लिपकार्ट आणि ऑफलाईन स्टोरमधून विकला जाणार :
कंपनीने असं म्हटलं जात आहे की, बाकीच्या मॉडेलप्रमाणे हा फोन फ्लिपकार्ट आणि ऑफलाईन स्टोअरच्या माध्यमातूनही विकला जाऊ शकतो. रिपोर्ट्सनुसार, बँक ऑफरच्या माध्यमातून कंपनीला 3 हजार रुपयांच्या इन्स्टंट डिस्काउंटमध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. ओप्पो रेनो 9 शिमर ब्लॅक आणि शिमर गोल्ड कलरमध्ये, तर रेनॉल्ट 8 प्रो ग्लेझ ब्लॅक आणि ग्लेज ग्रीनमध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

50 मेगापिक्सलचा कॅमेरा :
ओप्पो रेनो 8 हा फोन 6.43 इंचाचा एमोलेड डिस्प्लेसह 120 हर्ट्ज रिफ्रेश रेटसह येणार आहे. इतर प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये मीडियाटेक डायमेन्शन १३०० एसओसी, ५०-मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, २५६ जीबी पर्यंत यूएफएस ३.१ स्टोरेज आणि ८० डब्ल्यू सुपर फ्लॅश चार्ज फास्ट चार्जिंग ऑफर करणारी ४,५०० एमएएच बॅटरीचा समावेश आहे.

स्मार्टफोन ४५०० एमएएच बॅटरी :
मायस्मार्टप्रिसच्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या फेडरल कम्युनिकेशन्स कमिशनच्या वेबसाइटवर ओप्पो रेनो ८ प्रो ५ जी या ग्लोबल व्हेरियंटला सीएफएच २३५७ या मॉडेल नंबरसह पाहण्यात आले आहे. लिस्टिंगमध्ये पुष्टी झाली आहे की हा स्मार्टफोन ४५०० एमएएच बॅटरी आणि ८० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टद्वारे समर्थित असेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Oppo Reno Smartphones online sale on Flipkart check details 06 July 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Oppo Reno Smartphone(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या