Realme C30 | रियलमीचा स्वस्त फोन आज होणार लाँच | रियलमी C30 फोनचे फीचर्स जाणून घ्या
Realme C30 | रियलमी आज सोमवारी (20 जून) आपला स्वस्त स्मार्टफोन रियलमी सी 30 भारतीय बाजारात लाँच करणार आहे. दुपारी १२.३० वाजता हा स्मार्टफोन लाँच होणार असून ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर याची विक्री होणार आहे. लाँचिंगपूर्वीच फोनचे फोटो आणि बहुतांश फीचर्स समोर आले आहेत. फोनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याचे डिझाइन, जे तुम्हाला वनप्लस 10 आर ची आठवण करून देऊ शकते. चला जाणून घेऊया फोनची अधिक माहिती.
Realme C30 ची वैशिष्ट्ये :
रियलमी सी ३० स्मार्टफोनमध्ये युनिसोक टी ६१२ प्रोसेसर असणार आहे. परफॉर्मन्समध्ये हा प्रोसेसर स्नॅपड्रॅगन 665 सारखाच राहू शकतो. डिझाइनबद्दल बोलायचे झाले तर, यात सपाट कडा असलेल्या वॉटरड्रॉप नॉचसह डिस्प्ले असेल. मागच्या बाजूला स्ट्रिपसारखे डिझाइन आणि एलईडी फ्लॅशसह सिंगल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. मागील कॅमेऱ्याचा आकार बराच मोठा ठेवण्यात आला आहे. हा कॅमेरा १३ मेगापिक्सलचा असणार आहे.
सेल्फीसाठी 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा :
फोनमध्ये ६.५८ इंचाचा फुलएचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले मिळेल. सेल्फीसाठी यात 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असणार आहे. फोनमध्ये ५,० एमएएचची बॅटरी आहे, जी दिवसभर चालते. ही बॅटरी १० वॉट चार्जिंगला सपोर्ट करते आणि मायक्रो-यूएसबी चार्जिंग पोर्टसह येते. फोनमध्ये खालच्या बाजूला ३.५ एमएम हेडफोन जॅक, उजव्या बाजूला व्हॉल्यूम आणि पॉवर बटण आणि डाव्या बाजूला सिम कार्ड स्लॉट आहे. फोनचे वजन १८२ ग्रॅम आहे.
काय असेल किंमत :
रियलमी सी ३० स्मार्टफोन अँड्रॉइड १२ गो एडिशनवर आधारित रियलमी यूआयवर काम करेल. हे लेक ब्लू, बांबू ग्रीन आणि डेनिम ब्लॅक या 3 कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध असेल. हँडसेट भारतासाठी २ जीबी + ३२ जीबी आणि ३ जीबी + ३२ जीबी मेमरी कॉन्फिगरेशनमध्ये येण्याची शक्यता आहे. येथे याची किंमत सुमारे १२ हजार रुपये असू शकते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Realme C30 smartphone will be launch today check price in India 20 June 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा