22 September 2019 2:17 PM
अँप डाउनलोड

शाओमीचा हा स्मार्टफोन आहे सोलारवर चार्ज होणारा

Xiaomi Smartphone, Solar Panel, Android Phone, Smartphone, Mobile

मुंबई : नवनवीन फीचर्स असलेले स्मार्टफोन लाँच केल्यानंतर शाओमी आता एक नवीन स्मार्टफोन बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. या स्मार्टफोन मध्ये सोलार पॅनलचा पवार केला जाणार आहे. म्हणजेच हा फोन उन्हातही चार्ज केला जाऊ शकतो. शाओमीच्या मोबाइलला सॉफ्टवेअरने मागील वर्षीच स्मार्टफोनच्या सोलार सेल मोड्युलच पेटेंट कंपनीच्या नवे करून घेतल होत. या नव्या स्मार्टफोन मध्ये नो नॉच डिस्प्ले आहे.

शाओमी या फोनसाठी इन-डिस्प्ले कॅमेरा टेकनॉलॉजिचा वापर करण्याची शक्यता आहे. हा फोन ड्युअल कॅमेरा सेटअप असलेला असणार आहे. त्या कॅमेराच्या मध्ये फ्लॅश लाईट असणार आहे. सोलार पॅनल ला योग्य ती जागा देण्यासाठी या फोनच्या मागच्या बाजूला फिंगरप्रिंट देण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे सोलार पॅनल फोन च्या मोड्युल पेक्षाही हि लहान असणार आहे. फोनच्या मागे देण्यात येणाऱ्या या सोलर पॅनल मुले हा फोन चार्ज करता येणार आहे.

हा फोन बाजारात कधी येणार हे अद्याप केलेले नाही. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील लोकांना हा फोन जास्त उपयोगाला येणार आहे. विजेच्या अभावापायी ग्रामीण लोकांना उन्हाच्या मदतीने हा फोन चार्ज करता येऊ शकतो.

अनुरूप वधू - वर सुचक मंडळ

हॅशटॅग्स

#gadgets(13)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या