29 March 2024 8:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 30 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर?
x

Curd with Banana Benefits | यावेळेत खा दही आणि केळी | आरोग्यास ठरतात लाभदायी - नक्की वाचा

Curd with banana beneficial

मुंबई, २३ ऑगस्ट | आपल्याला असे अनेक पदार्थ माहिती आहेत जे एखाद्या पदार्थासोबत खाल्ल्यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात. अशाच एका पदार्थाबद्दल आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत जो आपल्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहे. दही आणि केळे हे दोन पदार्थ एकमेकांसोबत खाल्ल्यामुळे आपल्याला अनेक फायदे होऊ शकतात. जाणून घ्या याबद्दलचे सर्व तपशील. केळ्यामुळे शरीराला लोह आणि शक्ती मिळते. तर दह्याचे सेवन एरवीही फायदेशीर असतेच. यातले चांगले जिवाणू पाचनतंत्र तंदुरुस्त ठेवतात आणि पोटाच्या समस्या दूर करतात. हे फूड कॉम्बिनेशन आपण न्याहारीच्या वेळी खाऊ शकता.

जाणून घ्या दही आणि केळे खाण्याचे फायदे (Curd with banana beneficial for health in Marathi) :

शरीराला शक्ती देते दही आणि केळ्याचे कॉम्बिनेशन:
जर आपण काम करताना लवकर दमत असाल तर केळे आणि दह्याचे सेवन करणे हे अतिशय लाभदायक आहे. हे कॉम्बिनेशन न्याहारीला खाल्ल्याने आपल्या शरीरात दिवसभर शक्ती राहते आणि थकवा जाणवत नाही. ज्या लोकांना अशक्तपणाची समस्या आहे त्यांनी हे आवर्जून खावे.

मलावरोधाच्या समस्येचा आहे रामबाण उपाय:
जर आपल्याला मलावरोधाचा त्रास असेल तर आपल्या न्याहारीत दही आणि केळे अवश्य घ्या. हे आरोग्यासाठी चांगले तर असतेच, पण मलावरोधाची समस्या दूर करण्यासही फायदेशीर असते. यासाठी आपण दह्यात केळे आणि सुकामेवाही घालू शकता.

दही आणि केळ्यामुळे वेगाने कमी होते चरबी:
दह्यात केळे घालून खाल्ल्यामुळे शरीरातील चरबी वेगाने कमी होते. कारण दही आणि केळ्यामध्ये तंतूमय पदार्थ भरपूर प्रमाणात असतात. यामुळे पोट बराच वेळ भरलेले राहते आणि खाण्याची इच्छा टाळली जाऊन वजन कमी होते.

पोटाच्या समस्या दूर होतात:
तुम्हाला जर पोटाच्या समस्या असेल तर केली आणि दही या दोन्ही पदार्थांचे सेवन करावे. यासाठी दह्यात केळी आणि सुकामेवे घालून सकाळच्या नाश्यात सेवन करावे. यामुळे आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत मिळते.

दह्यातील चांगले जिवाणू हाडे करतात मजबूत: (Yogurt with banana beneficial for health)

केळ्यात असलेले तंतूमय पदार्थ दह्यातील चांगल्या जिवाणूंच्या वाढीला मदत करतात. यामुळे कॅल्शियम अधिक चांगल्या प्रकारे शोषले जाते. त्यामुळे हाडांचे आरोग्य चांगले राहते.

शरीराला ऊर्जा मिळते:
अनेक लोकांना थोडे जरी काम केले की थकवा जाणवतो. यामुळे त्या लोकांनी केळी आणि दह्याचे सेवन करावे. हे दोन्ही पदार्थ सकाळच्या नाश्यात घेतल्यास आरोग्याला फायदा होतो. तसेच दिवसभर आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. ज्या लोकांमध्ये अशक्तपणा अधिक जाणवतो त्या लोकांनी या पदार्थांचे सेवन करणे गरजेचे आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Curd with banana beneficial for health in Marathi.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x