4 May 2025 5:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

Health First | शरीरातील चरबी घटविण्यासाठी या सवयींचा अवलंब करा | वाचा आणि शेअर करा

Fat burning habits

मुंबई, 20 जून | शरीरामध्ये साठलेली चरबी आणि हाताबाहेर वाढलेले वजन यांमुळे व्यक्ती अनाकर्षक तर दिसू लागतेच, पण त्याशिवाय वाढणारे वजन आणि चरबी अनेक आजारांना निमंत्रण ठरू शकते. त्यामुळे वजन घटविण्यासाठी आहारावर नियंत्रण आणि सक्रीय जीवनशैली यांची आवश्यकता असते. अनेक जण आहारामध्ये तात्पुरते बदल करून, भरपूर व्यायाम करून वजन घटविण्यात यशस्वी होतात देखील, मात्र एकदा वजन कमी झाल्यानंतर आहार पूर्वपदावर जातो आणि घटलेले वजन पुन्हा वाढू लागते. त्यामुळे वजन आणि शरीरातील चरबीचे प्रमाण कमी करावयाचे असल्यास आहाराशी आणि जीवनशैलीशी निगडित काही सवयींचा अवलंब कायमस्वरूपी असायला हवा.

वजन घटविण्यासाठी आहारामध्ये फायबरची मात्रा योग्य असणे आवश्यक आहे. ताज्या भाज्या, फळे यांच्या माध्यमातून शरीराला आवश्यक ते फायबर मिळत असते. फायबरमुळे पोट दीर्घकाल भरलेले राहून भूक लवकर शमते, तसेच यामुळे पचनक्रिया अधिक सक्रीय होते. फायबरमुळे शरीरातील इंस्युलीनची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. या साठी शरीराला दररोज पंचवीस ते तीस ग्राम फायबरची आवश्यकता असते. फायबर सोबतच आपल्या आहारामध्ये प्रथिनांचा ही समावेश असायला हवा. ताज्या भाज्या, मासे, अंडी, इत्यादी पदार्थांमध्ये प्रथिने मोठ्या प्रमाणावर असतात. यांमुळे स्नायूंना बळकटी मिळून शरीरातील चरबी घटण्यास मदत होत असते.

आपल्या आहारामध्ये ‘व्हाईट कार्ब्स’, म्हणजेच मैद्यापासून बनलेल्या पदार्थांचा समावेश मर्यादित असावा. साखर, पास्ता, ब्रेड, केक सारखे पदार्थ थोड्याच प्रमाणात खाल्ले जावेत, तसेच बटाटा आणि भात देखील मर्यादित प्रमाणात खाल्ला जावा. शरीरामध्ये योग्य आर्द्रता ठेवण्यासाठी आवश्यक त्या प्रमाणात पाणी पिणेही महत्वाचे आहे. पोषक घटक पाण्याच्या माध्यमातून शरीरामध्ये पोहोचविले जात असतात. त्यामुळे पाण्याचे सेवन आवश्यक आहे. आपल्या आहारातून साखरयुक्त पेये, सोडा किंवा तत्सम पेये वर्ज्य करावीत. तसेच चहा व कॉफीचे प्रमाणही मर्यादित असावे. शक्य असेल, तेव्हा चहा किंवा कॉफीऐवजी साधे पाणी, नारळ पाणी, ताज्या भाज्यांचा किंवा फळांचा (साखरविरहित) रस, ताजे ताक यांचा समावेश आहारामध्ये असावा.

व्यायाम करत असताना ‘कार्डियो’चे प्रमाण योग्य असावे. या प्रकारचे व्यायाम केल्याने शरीरातील चरबी वेगाने घटू लागते हे खरे असले, तरी हे व्यायाम प्रमाणाबाहेर केल्याने कालांतराने शरीर चरबी सोबत ‘मसल बर्न’ देखील करू लागते. त्यामुळे अश्या व्यायामाचे प्रमाण आठवड्यातून तीस मिनिटांची तीन ते चार सेशन्स, इतकेच असावे. आहार, व्यायाम, आर्द्रता, यांच्याबरोबर आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे योग्य प्रमाणात घेतलेली झोप. शरीरातील चरबी घटण्याची प्रक्रिया व्यक्ती झोप घेत असताना सुरु असते. त्यामुळे आठ ते तास तासांची सलग विश्रांती शरीराला मिळणे आवश्यक आहे. वजन घटविण्याची प्रक्रिया ही प्रत्येकाच्या शरीराच्या बाबतीत निरनिराळ्या वेगाने घडून येणारी आहे. त्यामुळे इतरांशी तुलना न करता सातत्याने प्रयत्न सुरु ठेवणे आवश्यक आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

News Title: Fat burning habits to stay health news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या