Health First | 'काचबिंदू' डोळ्यांचा गंभीर आजार | कारणे आणि उपचार

मुंबई, १७ ऑगस्ट | काचबिंदू हा डोळ्यांचा गंभीर आजार आहे. ज्यामध्ये ऑप्टिक नर्व्हला हानी झाल्यामुळे हा आजार होऊ शकतो. डोळ्यांनी पाहिलेली दृश्य ऑप्टिक नाडीद्वारे आपल्या मेंदूपर्यंत पोहचवत असतो. पण या आजारात महत्वाच्या नाडीवर परिणाम झालेला असतो.
या आजारात डोळ्यांच्या आत हाय प्रेशर निर्माण झाल्याने त्याचा परिणाम ऑप्टिक नाडीवर होत असतो. या गोष्टीमुळे अंधत्व सुद्धा होऊ शकतं. काचबिंदूला डोळ्यांचा सायलंट किलर म्हणतात. काचबिंदू होताना काही लक्षणे जाणून येतात जसे की डोळ्यात तीव्र वेदना होणे,अस्पष्ट दिसणे, डोळे लाल होणे, डोके दुखणे, मळमळ व उलट्या होणे, कडेच्या वस्तू न दिसणे इत्यादी.
वयाच्या साठी पार केलेल्या व्यक्ती, अनुवंशिकता, मधुमेह रुग्ण, हाय ब्लड प्रेशर अशा रुग्नांणा हा आजार होऊ शकतो. काचबिंदूचे निदान विविध डोळ्यांच्या तपासण्या करून केले जाते. यावर उपचार म्हणजे काही ड्रॉप्स आणि औषधे यामुळे हा आजार बरा होऊ शकतो.
काचबिंदू होण्याची कारणे:
आपल्या डोळ्यांच्या मागे एक विशिष्ट प्रकारचा द्रवपदार्थ म्हणजे ‘अॅक्वेयस ह्युमर’ तयार होत असतो. यामुळेच आपले डोळे ओलसर राहत असतात. मात्र काही कारणांमुळे जेव्हा, हा द्रवपदार्थ वाहून नेणाऱ्या वाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यास डोळ्यातील प्रेशर वाढू लागतो. या वाढणाऱ्या दाबाचा परिणाम महत्त्वाच्या अशा ऑप्टिक नाडीवर झाल्यामुळे काचबिंदू हा दृष्टीविकार होत असतो. ऑप्टिक नाडीची अधिक हानी झाल्यास दृष्टी जाण्याचा धोका असतो.
याची काही कारणे आहेत जसे की आपल्या डोक्याच्या मागील बाजूस एक द्रव पदार्थ तयार होत असतो आणि त्यामुळे आपले डोळे ओलसर राहत असतात. पण जेव्हा हा द्रवपदार्थ वाहून नेणाऱ्या नाडीमध्ये अडथळा निर्माण झाला की डोळ्यात प्रेशर वाढू लागतं आणि या दाबाचा परिणाम ऑप्टिक नाडीवर होत असल्यामुळे काचबिंदू हा आजार होतो. डोळ्यातील प्रेशर कधीकधी ऑप्टिक नाडीला रक्तपुरवठा कमी झाल्याने सुद्धा होतो तर कधी हाय ब्लड प्रेशर ची समस्या असल्याने सुद्धा हा आजार बळावू शकतो.
डोळ्यातील प्रेशर वाढण्यासाठी खालील घटकसुद्धा कारणीभूत ठरू शकतात:
• स्टेरॉईड्सयुक्त औषधांच्या दुष्परिणामामुळे
• ऑप्टिक नाडीला अपुरा रक्तपुरवठा झाल्याने
• हाय ब्लडप्रेशरची समस्या यांमुळे डोळ्यातील इंट्राओक्युलर प्रेशर वाढू शकते. डोळ्यातील प्रेशर 21 mmHg पेक्षा जास्त असल्यास त्या स्थितीला ocular hypertension असे म्हणतात.
ग्लॅकोमा कोणाला होऊ शकतो..?
• वयाच्या साठीनंतरच्या व्यक्ती,
• कुटुंबात काचबिंदूची अनुवंशिकता असणे
• डोळ्याला दुखापत झालेल्या व्यक्ती
• मधुमेही रुग्ण
• हाय ब्लडप्रेशरचे रुग्ण
• कॉर्टिकोस्टेरॉईड्ससारखी औषधे घेणाऱ्या व्यक्ती यांमध्ये काचबिंदू आजार होण्याचा धोका जास्त असतो.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Glaucoma symptoms in Marathi news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO
-
AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL
-
JP Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक फोकसमध्ये; यापूर्वी 2004 टक्के परतावा दिला - NSE: JPPOWER
-
Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप स्टॉक 5.23 टक्क्यांनी घसरला; शेअर्सबाबत महत्वाची अपडेट - NSE: TATATECH
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअरची पुन्हा चर्चा, तेजीचे स्पष्ट संकेत, यापूर्वी दिला 403 टक्के परतावा - NSE: IRFC