4 May 2025 4:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

Health First | चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स घालवण्याचा घरगुती रामबाण उपाय - नक्की वाचा

Home remedies for blackheads

मुंबई, २८ जून | व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका बजावते ते म्हणजे व्यक्तीचा चेहरा. चेहऱ्याचा रंग कुठलाही असो मात्र चेहरा नितळ डाग रहित असणे खूप महत्त्वाचे आहे, यामुळेच व्यक्ती प्रफुल्लित दिसतो तसेच चेहऱ्यामुळे व्यक्तीचे एकंदरीत आरोग्य लक्षात येते.

सध्या वाढते प्रदूषण व वेगवेगळ्या केमिकलयुक्त सौंदर्यप्रसाधनांचा अतिरिक्त वापर यामुळे चेहऱ्यावर मुरूम, दाग धब्बे तसेच नाकावरील ब्लॅकहेड्सचे प्रमाण वाढणे या समस्या सामान्य परंतु गंभीर बनत चाललेले आहेत. अशा या समस्यांवर केमिकलयुक्त प्रसाधनांऐवजी आयुर्वेदीय घटकांचा जर वापर केला तर कुठल्याही साईड इफेक्ट शिवाय खूप मोठा फायदा मिळतो.

आयुर्वेदामध्ये आपल्या नित्याच्या वापराच्या अशा काही महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत ज्यांचा नियमित वापर केल्यास चेहऱ्याचे सौंदर्य खूप सुधारते. चेहरा नितळ तेजस्वी डाग रहित बनतो. चला तर मग जाणून घेऊया चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स व दाग धब्बे घालवण्याचा रामबाण उपाय.

चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स घालवा फक्त पाच मिनिटात:
व्यक्तीच्या सौंदर्यामध्ये बाधा आणणारा सर्वात मोठा घटक म्हणजे चेहऱ्यावरील ब्लॅक हेड्स. ब्लॅकहेड नाकावर जास्त प्रमाणात येतात. हे घालण्याकरीता आपल्याला सर्वप्रथम लागणारी वस्तू म्हणजे कोलगेट, यासोबतच एक चमचा मीठ व एक चमचा तांदळाचा चूरा आवश्यक आहे. हे तिन्ही मिश्रण एकजीव करून घेणे आवश्यकता वाटल्यास यामध्ये थोडेसे पाणी टाकावे व संपूर्ण मिश्रण एकजीव झाल्यानंतर ब्लॅकहेड्स असलेल्या भागावर पाच मिनिट लावून ठेवावे त्यानंतर हलक्या हाताने मसाज करून नंतर कोमट पाण्याने धुऊन घ्यावे. यामधील मीठ व तांदळाचा चुरा हे नॅचरल स्क्रबर म्हणून काम करतात, यामुळे चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स झटक्यात गायब झालेले दिसतील, हा अतिशय रामबाण व खूपच स्वस्त असा उपाय आहे, हा उपाय आठवड्यातून एक वेळा केल्यास खूप मोठा फायदा मिळतो.

बेसन, हळद, दुधाचा रामबाण उपाय:
आयुर्वेदामध्ये सौंदर्य वाढवत असताना हळदीला खूप महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. हळदीमुळे चेहरा नितळ कांतीमय बनतो. सर्वप्रथम दोन चमचे बेसन यामध्ये एक चमचा हळद पावडर व मिश्रण एकजीव करण्याकरिता आवश्यक दुधावरची साय घेऊन संपूर्ण मिश्रण एकजीव केल्यानंतर सदरील लेप चेहऱ्यावर पाच मिनिटाकरिता लावून ठेवल्याने व हलका मसाज केल्याने, नंतर कोमट पाण्याने धुऊन टाकल्याने चेहऱ्यावरील दाग धब्बे तसेच ब्लॅकहेड्स कमी होण्यास मदत होते. हा उपाय नियमित आठवड्यातून एक वेळा करणे खूप फायदेशीर ठरते.

संत्र्याच्या सालीचा उपाय:
संत्र्याच्या सालीचे मध्ये विटामिन सी चे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आढळते. जे की चेहर्यासाठी खूपच लाभदायक असते. संत्र्याच्या सालीची पावडर नियमित हळद व लिंबाचा रस सोबत चेहऱ्याला लावल्यास चेहऱ्यावरील डाग धब्बे कमी होतात.

अशाप्रकारे सदरील उपायांचा वापर केल्यास चेहऱ्याच आरोग्य सुधारण्यास मदत होते व कुठल्याही साईड इफेक्ट शिवाय चेहऱ्याचे सौंदर्य सुधारते व तेही खूपच कमी खर्चात.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: Home remedies for removing blackheads from face health news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या