Health First | तुमचा चेहरा सुजल्यासारखा वाटतोय ? हे उपाय करून पाहा

मुंबई, १५ जून | तुमचाचेहरा जास्त सुजल्यासारखा वाटतोय? डोळे बारीक दिसू लागले आहेत? उत्तर होय असेल, तर वेळीच सावध व्हा. ही चेहर्यावर सूज येण्याची लक्षणे असू शकतात. तज्ज्ञांच्या मते, असे अँलर्जीमुळेही होऊ शकते आणि खाण्यापिण्यातील निष्काळजीपणामुळेही. ही कारणे असू शकतात. तज्ज्ञांच्या मते, शरीरात होणारे अंतर्गत बदल आणि बाह्य कारणांमुळे चेहर्यावर सूज येऊ शकते. अनेक वेळा चुकीच्या कॉस्मेटिक्सचा वापर, एखाद्या खाद्यपदार्थाचे वा औषधींचे सेवन केल्यानंतर आणि कधी अँलर्जी निर्माण करणारे घटक श्वासाद्वारे शरीरात गेल्यास असे होऊ शकते, तर अनेकवेळा ओरल कॅव्हिटी वा दातांशी निगडित समस्यांमुळेही चेहर्यावर सूज येऊ शकते.
हे उपाय असतात:
तज्ज्ञांच्या मते, चेहर्यावर सूज येण्याची ठोस कारणे जाणून घेण्यासाठी पीडिताने त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधायला हवा. डॉक्टरच तपासणी करून योग्य ते उपचार करू शकतात. जर एखाद्या औषधाच्या सेवनाने असे झाले असेल तर त्याचे सेवन लगेच बंद करण्याचा आणि अँलर्जी रिअँक्शन असेल तर अँटिबायोटिक घेण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो. जर सूज येण्याबरोबरच थोड्याशा वेदनाही असतील तर अशावेळी इम्फ्लेमेंटरी औषध प्रिस्क्राइब केले जाते. याउलट दातांना असा संसर्ग झाला तर तेव्हाही अँटिबायोटिक वा जास्त त्रास झाल्यास दात काढण्याची वा योग्य उपचार घेण्याचा सल्ला दिला जातो.
हे देखील करून पाहा:
* चेहर्यावर सूज येण्याची कारणे भले कोणतीही असोत, मात्र ती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करता येऊ शकतात. जाणून घेऊया याबाबत..
* बर्फ लावा बर्फाचा छोटासा तुकडा चेहर्यावर लावल्याने चेहर्यावरील सूज कमी होऊ शकते. मुलायम टॉवेल वा एखाद्या कपड्यात बर्फाचा तुकडा ठेवून सूजलेल्या जागी हळूहळू लावा. असे दिवसातून चार ते पाच वेळा करा.
* हळद व चंदन चेहर्यावरील सूज वा वेदना दूर करण्यात रक्तचंदन वा हळदीच्या पुडीपासून तयार केलेला लेप बराच परिणामकारक ठरू शकतो. वाळल्यानंतर तो कोमट पाण्याने धुऊन टाका.
* कमी मीठ अधिक सोडियम म्हणजेच जास्त मीठ असलेला आहार घेतल्यानेही चेहर्यावर सूज येते. मिठाच्या जास्त प्रमाणामुळे त्वचेचा आतला थर पाणी रोखू लागतो आणि चेहरा सूजल्यासारखा दिसतो. त्यासाठी जास्त मीठ असलेले भोजन टाळा.
* उंच उशी झोपताना वापरल्या जाणारी उशी वा तक्क्या थोडा उंच असायला हवा. तज्ज्ञांच्या मते, जर डोके थोडे उंचवट्यावर असल्यास त्वचेमध्ये पाणी गोळा होणार नाही.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.
News Title: Home remedies on swelling face health news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
JP Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक फोकसमध्ये; यापूर्वी 2004 टक्के परतावा दिला - NSE: JPPOWER
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची भरारी; ग्लोबल फर्मकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये तेजीचे संकेत; मिळेल मजबूत परतावा - NSE: ADANIPOWER
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप स्टॉक 5.23 टक्क्यांनी घसरला; शेअर्सबाबत महत्वाची अपडेट - NSE: TATATECH