14 December 2024 2:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

Health First | फळांच्या साली | बऱ्याच आजारांवर उपयुक्त

hidden ailments, Fruit peels, health article

मुंबई, ९ जानेवारी: फळांचा पाचक म्हणून प्रमुख गुण आहे. फळांमध्ये पाचक म्हणून पपईचा क्रमांक खूप वर लागतो. पपईच्या झाडाचे मूळ, पाने, बिया, कच्ची पपई, पपईचा चीक व पिकलेली पपई सर्वच औषधी गुणांचे आहेत. पपईच्या मुळांचा काढा मूतखडय़ावर उपयुक्त आहे. पण तुम्हाला माहिती आहे का फळाच्या सालीही आपल्याला अनेक आजारांपासून वाचवू शकतात. यामुळे जर तुम्ही याच्यापुढे कधी केळी खाल तर केळीची साल फेकू नका. केळीसोबतच आपण संत्री आणि मोसंबीची साल फेकून देत असतो, पण हे चुकीचे आहे. (Many hidden ailments in fruit peels)

फळांच्या सालींमध्ये डिप्रेशन आणि इतर आजारापासून वाचविण्याचे गुण असतात. आपल्या त्वचेला मुलायम, दागरहित आणि चमकदार बनवण्यासाठी सालींची महत्वाची भूमिका आहे.

केळी- डिप्रेशन, मोतीबिंदू:
ताइवान येथील चूंग शान मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये केलेल्या संशोधनात आढळून आले आहे की, केळीच्या सालीमध्ये फीलगुड हार्मोन सेरोटोनिन मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. त्यामुळे नैराश्य, उदासी इत्यादीपासून मुक्ती मिळते. तसा केळीच्या सालीमध्ये लुटीन नावाचे अँटिऑक्सिडंट सुद्धा सापडते. हे अँन्टिऑक्सिडंट डोळ्यांमध्ये असलेल्या कोशिकांचे अल्ट्रा व्हायोलेट किरणांपासून बचाव करून मोतीबिंदूपासून सुरक्षा करते.

केळीच्या सालीचा वापर कसा करावा? (Bananas- Depression, cataracts)
केळीच्या सालीला दहा मिनिटे स्वच्छ पाण्यात उकळून ते पाणी थंड झाल्यानंतर पाणी गाळून प्यावे.

पोट आणि यकृतासंबंधी रोग: (Stomach and liver diseases)
ब्रिटनमधील रॉयल सोसायटी ऑफ मेडिसिन त्यांनी केलेल्या एका संशोधनात आढळून आले आहे की, नाशपातीच्या सालीत विटामिन सी तसेच फायबर आणि ब्रोमलेन याचा प्रचंड स्त्रोत होत आहे. तसेच चयापचय क्रिया व्यवस्थित ठेवून पोटातील मृत उतीना शरीराबाहेर टाकण्याचे काम करतो.

नाशपातीचा उपयोग कसा करावा? (How to use pears?)
नाशपातीचे ज्यूस किंवा शेक किंवा सूप बनवून प्यावे.

लसूण- हृदय रोग, स्ट्रोक: (Garlic- heart disease, stroke)
द जर्नल ऑफ न्यूट्रिशनमध्ये छापून आलेल्या एका जपानी लेखामध्ये लसणाच्या साली बद्दल माहिती दिली होती. लसणाच्या सालींमध्ये फिनायल प्रोपेनॉईड नावाचे ऑंटी एक्सीडेंट जास्त प्रमाणात असते. रक्तदाब सोबतच शरीरातील कोलेस्ट्रोलचा थर कमी करण्याचा काम करतो. त्यामुळे हृदयरोग आणि स्ट्रोकपासून बचाव होतो.

लसणाचा वापर कसा करावा? (How to use garlic?)
दररोज सकाळी लवकर रिकामा पोटी दोन लसणाच्या पाकळ्या साली सहित चघळावी.

संत्रा आणि मोसंबी: (Oranges and citrus)
रॉयल सोसायटी ऑफ मेडिसिन या संशोधनात आढळून आले आहे की, संत्रा आणि मोसंबीच्या सालीमध्ये सुपर फ्लावोनोईड उपलब्ध असते. तसेच शरीरातील कोलेस्टेरॉलचे थर कमी करण्याचे काम करतो. तसेच अँटिऑक्सिडंट, तसेच रक्तप्रवाह सुरु असताना धमन्यांवर दबाव पडत नाही. त्यामुळे हृदयरोग आणि स्ट्रोकपासून बचाव होतो.

बटाटे- पचन व्यवस्थेतील दोष करते दूर: (Potatoes- Eliminates defects in the digestive system)
जर्नल ऑफ मेडिकल प्लांट्समध्ये छापून आलेल्या एका संशोधनात पुढे केले होते की बटाट्याची साल हे झिंक, आयर्न, विटामिन सी, पोटॅशियम इत्यादीचा मुख्य स्त्रोत आहे. या सालीचा उपयोग रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी तसेच पचन व्यवस्था व्यवस्थित ठेवण्यासाठी होतो. त्वचा चमकदार तसेच डोळ्यांभोवती काळी वर्तुळे असतात ते दूर करण्यासाठी या बटाट्याच्या सालीचा उपयोग होतं.

 

News English Summary: The fruit has major digestive properties. Papaya ranks high among fruits as a digestive. The roots, leaves, seeds, raw papaya, papaya peel and ripe papaya of papaya tree all have medicinal properties. Extract of papaya root is useful on kidney stones. But did you know that even a year of fruit can save you from many diseases? So if you ever eat a banana before, don’t throw away the banana peel. We throw away the orange and citrus peel along with the banana, but this is wrong.

News English Title: Many hidden ailments in fruit peels health article news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x