4 May 2025 5:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

Health First | या 5 पदार्थांच्या अतिसेवनामुळे सुटू शकतं तुमचं पोट - नक्की वाचा

Overeating food belly fat

मुंबई, 27 जून | हल्ली पोट सुटलं नसेल अशा फारच कमी व्यक्ती दिसतात. त्याला कारणीभूत आहे सध्याची लाईफस्टाईल. हवं त्या वेळी वाट्टेल ते खाण्याची सवय अनेकांना इतकी लागली आहे. की, कधीकधी ते तत्या पदार्थांचे अतिरिक्त सेवन करत आहेत हे देखील विसरुन जातात. मग पोट कमी करण्यासाठी काय खाऊ आणि काय नको असा प्रश्न नेहमीच अनेकांना पडतो. पण तुम्हाला माहीत आहे का? तुम्ही काही असे पदार्थ खाता ज्यामुळे तुमचे पोट सुटू शकते. हे पदार्थ खाल्ले तर काय फरक पडतो असे तुम्हाला वाटत असेल तर हेच काही पदार्थ तुमचे पोट वाढवू शकतात आता हे पदार्थ कोणते ते देखील पाहुया.

वडापाव:
वडापाव हा असा पदार्थ आहे. जो अनेकांना आवडतो. एकदा ते वडापाव खायला लागले की, एकामागोमाग एक दोन-चार वडापाव आरामात खातात. वडापावमध्ये असलेला बटाटा आणि पाव तुमचे पोट वाढवण्यासाठी जबाबदार असतो. आठवड्यातून एक वडापाव चवीपुरता खाणे आणि एकावेळी 2 ते 4 वडापाव खाणे यामध्ये खूप फरक आहे. हा पदार्थ तळलेला असतो. त्यामुळे तुम्हाला तो अधिक त्रास देऊ शकतो. बटाटावड्यातील बटाटा आणि मैदा या दोन्ही गोष्टींच्या अतिसेवनामुळे तुमचे पोट सुटते.

फ्रेंच फ्राईज:
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचाच आवडता पदार्थ आहे फ्रेंचफ्राईज. मस्त केचअपमध्ये बुडवून खायला अनेकांना आवडतो. कितीही नाही म्हटले तरी हे खाण्याचा मोह कोणालाच आवरत नाही. पण तुम्ही सतत याचे सेवन केले तर त्यामुळे आलेला स्थुलपणा लगेच दिसतो. बटाटा तुमच्या डोक्यात नाही तर अतिसेवनामुळे तुमच्या शरीरभर पसरतो.

नुडल्स:
काहींना इन्स्टंट नुडल्स खायला प्रचंड आवडतात.2 मिनिटात झटपट नुडल्स रेसिपी तयार होतात म्हणून अनेक जण फावल्या वेळेत भूक लागली नसेल तरी असे पदार्थ करुन खातात. हे सगळे इन्स्टंट नुडल्स मैद्यापासून तयार झालेले असतात. मैदा शरीरात चिकटून राहतो आणि तुमचे फॅट वाढवतो. वाढलेले फॅट / चरबी तुम्हाला तुमच्या पोटाभोवती कालांतराने दिसू लागतेच.

शेवपुरी, रगडापेटीस,भेलपुरी:
चाटच्या सगळ्या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात बटाटा वापरला जातो. शिवाय मैदाच्या पुऱ्या, शेव असे तळलेले पदार्थ यात घातले जातात. काही जणांना अगदी रोजच चाट खायची सवय असते. लिंबू पिळलेले, मस्त चटकमटतक चटणी घातलेले हे चाट अनेकांना इतके आवडतात की, विचारता सोय नाही. पण यांच्या नित्यसेवनामुळे तुमच्या शरीरातील फॅट वाढू शकते. आठवड्यातून दोनदा चाट खाण्यास काहीच हरकत नाही. पण ते खाण्याचेही योग्य प्रमाण असावे.

बटर:
पावभाजीवर एक्स्ट्रा बटर मागवून खायची अनेकांना सवय असते. बटरमध्ये चळचळलेला पाव आणि पावभाजीवर आलेला बटरचा तवंग अनेक जण बोट चाखून खातात. पण हे बटर तुमच्या पोटासाठी चांगले नाही. कारण त्यामुळे तुमचे पोट सुटू शकते. बटरच्या अतिरिक्त सेवनामुळे तुमचे पोट वाढू शकते. जर तुम्हाला बटरला रिप्लेस करायला काही हवे असेल तर तुम्ही बटरऐवजी तूपाचे सेवन करु शकता. बटरमुळे तुम्हाला पोट साफ होण्यास अडथळा येऊ शकतो. पण तूपामुळे मात्र तुम्हाला कोणताही त्रास होत नाही. अनेकांना तूपाचा वाच आवडत नाही. पण नित्य जेवणात 2 चमचे तूप असावे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: Overeating of five food can increase your belly fat article news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या