12 April 2021 5:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

Health First | म्हणून अक्रोड कवचासहच खरेदी करावा

Walnuts, beneficial, Health article

मुंबई, २८ फेब्रुवारी: पौष्टिक अक्रोडास सुक्यामेव्यात महत्वाचं स्थान असते. केक किंवा अन्य पदार्थांमध्ये अक्रोड वापरले जातात. अक्रोड हे कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, ‘अ’ व ‘ब’ जीवनसत्व , प्रथिने, तंतूमय व पिष्टमय पदार्थांचा खजिना आहे. मेंदूच्या दुर्बलतेवर अक्रोड फायदेशीर आहे म्हणूनच बदाम, पिस्त्यासोबत अक्रोडचंही सेवन करतात. हल्ली बाजारात अक्रोडचा गर मिळतो, अक्रोडचं कवच अत्यंत टणक असतं म्हणूनच कवच फोडून त्यातील गर विक्रीसाठी असतो. (Walnuts beneficial for health article)

BhagyaVivah Marathi Matrimonial

अक्रोड कवचासहित घेतला तर बाजारात त्याची किंमत कमी असते. परंतु, अक्रोड गर घेतला तर मात्र त्याची किंमत वाढते. अनेकजण अक्रोड गरच विकत घेणं पसंत करतात, परंतु अक्रोड गर विकत घेण्यापेक्षा कवचासहित अक्रोड विकत घ्यावा. (Instead of buying walnuts, buy walnuts with shells)

त्यासाठी कवचासहित विकत घ्यावा अक्रोड?

  1. फोडलेला अक्रोड जितके दिवस बाहेर राहील त्या प्रमाणात त्याचे गुणधर्म, स्वाद व चव कमी होत जाते. अक्रोडचा गर हा साधरण चवीला तुरट, मधूर, आणि कडू असतो. मात्र बरेच दिवस कवचाबाहेर राहिल्यानं त्याची चव बदलत जाते.
  2. अक्रोडच्या गरात निसर्गत: तेल असते. या तेलामुळे बराचवेळ अक्रोड बाहेर राहिल्यास किड लागून त्याचा गर खराब होतो. म्हणून अक्रोड हा कवचासहित विकत घ्यावा. जेव्हा गरज असेल तेव्हा तो फोडून खावा.
  3. अमेरिकन हार्ट असोशिएशनच्या संशोधनानुसार अक्रोड हे हृदयसाठी चांगले असते. अक्रोडच्या नियमीत सेवनानं हृदयविकाराचा धोका कमी होतो असं म्हटलं आहे.
  4. लॉस एंजेलिसमधील कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधनानुसार अक्रोड सेवनानं प्रकार-२चा मधुमेह विकसित होण्याचा धोका ४७ टक्क्यांनी कमी होतो.
  5. तसेच चयापचय क्रियेसाठीही अक्रोड फायदेशीर असल्याचं समोर आलं आहे. जेवणानंतर अक्रोड खाल्ल्यानं पचन व्यवस्थित होण्यास मदत होते. तसेच यामध्ये असणाऱ्या तेलामुळे व तंतुमय पदार्थांमुळे शौचास साफ होते.

 

News English Summary: Nutritious walnuts have an important place in nuts. Walnuts are used in cakes or other dishes. Walnuts are a treasure trove of calcium, phosphorus, iron, vitamins A and B, protein, fiber and starch. Walnuts are good for brain weakness, that’s why they consume walnuts along with almonds and pistachios. Walnut kernels are available in the market these days.

News English Title: Walnuts beneficial for health article news updates.

हॅशटॅग्स

#Health(274)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x