15 December 2024 11:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा
x

Budh Margi 2024 | 'या' 3 राशींमध्ये तुमची नशीबवान राशी आहे का? बुध ग्रह जानेवारीत मार्गी होताच नशीब अनेक मार्गाने चमकणार

Budh Margi 2024

Budh Margi 2024 | ग्रहांचा राजकुमार बुधाच्या कृपेने व्यक्तीला व्यवसाय आणि करिअरमध्ये बरीच प्रगती होते. बुध सुमारे महिनाभर कोणत्याही राशीत राहतो. 27 नोव्हेंबर ला बुध धनु राशीत प्रवेश केला. 13 डिसेंबररोजी बुध धनु राशीत वक्री अवस्थेत येईल. त्यानंतर २८ डिसेंबरला वक्री बुध धनु राशीतून बाहेर पडून वृश्चिक राशीत प्रवेश करेल.

त्यानंतर नवीन वर्ष २०२४ मध्ये २ जानेवारीला बुध ग्रह मार्गी होणार. अशा वेळी बुधाच्या मार्गी म्हणजे सरळ चालीमुळे मेष ते मीन राशीवर परिणाम होणार आहे. त्यापैकी बुध मार्गी होण्याने कोणत्या राशींवर अत्यंत शुभ परिणाम होणार त्या राशी पाहून घेऊया…

कन्या राशी
बुध ग्रह कन्या राशीचा स्वामी आहे. अशा तऱ्हेने 2024 मध्ये कन्या राशीच्या लोकांवर मार्गी बुधाचा सर्वात शुभ प्रभाव राहील. कन्या राशीच्या व्यक्तींना जानेवारी २०२४ मध्ये धन लाभण्याची दाट शक्यता आहे. करिअरमध्ये नवी उंची गाठता येईल. व्यापाऱ्यांच्या व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. या काळात तुम्हाला एखादा नवीन प्रकल्प ही मिळू शकतो. यामुळे आर्थिक स्थिती भक्कम होण्यास सुरुवात होणार आहे.

मकर राशी
बुध मकर राशीच्या लोकांसाठी सुखद परिणाम आणू शकतो. वर्ष २०२४ मधील जानेवारी महिना मकर राशीच्या लोकांच्या जीवनात आनंद घेऊन येईल. मकर राशीच्या जातकांना मार्गी बुधाकडून आकस्मिक धनलाभ होऊ शकतो. व्यवसायात नफा होण्याची शक्यता आहे. नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांना नोकरीत पदोन्नती सह उत्पन्नात वाढ मिळू शकते. गुंतवणुकीचा लाभ मिळू शकतो. आर्थिक लाभ होण्यासाठी हा काळ अत्यंत शुभं असेल.

वृश्चिक राशी
वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे. वृश्चिक राशीच्या व्यक्तींच्या वैवाहिक जीवनात बुध गोडवा आणेल. जानेवारी महिन्यात एखादा शुभ कार्यक्रम होऊ शकतो. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आत्मविश्वास वाढेल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती सुधारून पैसा खेळता राहील.

News Title : Budh Margi 2024 effect on the 3 zodiac signs 08 December 2023.

हॅशटॅग्स

#Budh Margi 2024(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x