14 December 2024 7:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Bonus Shares | फुकट शेअर्स मिळतील! फक्त 98 रुपयांचा शेअर या तारखेआधी खरेदी करा, वेगाने पैसा वाढेल

Bonus Shares

Bonus Shares | ध्यानी टाइल्स कंपनीच्या शेअर धारकांसाठी एक नवीन अपडेट आली आहे. नुकताच ध्यानी टाइल्स कंपनीने आपल्या पात्र शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली होती. आता या कंपनीने आपली बोनस शेअर्सची रेकॉर्ड डेट बदलण्याची घोषणा केली आहे. गुंतवणूकदारांनी बोनस शेअर्सचा लाभ घेण्यासाठी नवीन रेकॉर्ड तारखेची नोंद घ्यावी. | Dhyaani Tile Share Price

बोनस शेअर्सची रेकॉर्ड तारीख बदलण्याचा फटका कंपनीच्या शेअरधारकांना बसला आहे. कारण या बातमीमुळे कंपनीचे शेअर्स घसरले आहेत. आज शुक्रवार दिनांक 8 डिसेंबर 2023 रोजी ध्यानी टाइल्स स्टॉक 5.00 टक्के घसरणीसह 98.12 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

ध्यानी टाइल्स कंपनीने बोनस शेअर्सबाबत नवीन अपडेट जाहीर करताच गुंतवणूकदारांमध्ये किंचित निराशा पसरली आहे. या कंपनीचे शेअर्स जबरदस्त विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. सेबीला दिलेल्या माहितीत ध्यानी टाइल्स कंपनीने सांगितले आहे की, कंपनीने पूर्वी बोनस शेअर्स वाटप करण्याकरता शेअरधारकांची पात्रता निश्चित करण्यासाठी 7 डिसेंबर 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केला होता. तर आता कंपनीने या तारीखमध्ये बदल करून नवीन रेकॉर्ड डेट 12 डिसेंबर जाहीर केली आहे.

ध्यानी टाइल्स कंपनीने आपल्या 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या 5 शेअर्सवर 9 बोनस शेअर्स मोफत देण्याची घोषणा केली होती. ही कंपनी पहिल्यांदाच आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या लोअर सर्किटमध्ये अडकले होते  आणि शेअरची किंमत 103.28 रुपयेपर्यंत घसरली होती. मागील एका महिन्यात ध्यानी टाइल्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 12 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला होता. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 49 टक्क्यांनी वाढली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bonus Shares on Dhyaani Tile Share Price NSE 08 December 2023.

हॅशटॅग्स

Bonus shares(93)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x