Horoscope Today | आज कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी तिथी आहे. त्याचबरोबर आज दिवाळी सणाचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस आहे. वसुबारसेच्या दिवशी अनेकांचे भाग्य उजळणार असून, जीवनात धनधान्य, ऐश्वर्य आणि नवीन संधी चालून येणार आहेत. पहा तुमचे आजचे राशीभविष्य.
मेष
मेष राशीच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस अत्यंत फलदायी असून जीवनात नवीन संधी चालून येण्याचा योग दिसत आहे. त्याचबरोबर कौटुंबिक वादातून मुक्तता मिळवाल. लहान मुलांबरोबर दिवस आनंदात जाण्याची शक्यता आहे. आज गोमातेला भोग चढवाल त्याचबरोबर दिवसभर आनंदी राहाल.
वृषभ
वृषभ रास असलेल्या व्यक्तींचा दिवस देखील अत्यंत आनंदमय असेल. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराचं जास्तीच प्रेम मिळण्याची शक्यता आहे. दिवसाची संध्याकाळ जोडीदाराबरोबर अतिशय रमत जमत आणि प्रेमात जाईल. तुमच्या केलेल्या प्रकल्पांमध्ये यश प्राप्ती होईल.
मिथुन
मिथुन राशीच्या व्यक्तींचा आजचा दिवस मित्रांबरोबर जाऊ शकतो. त्याचबरोबर मित्रांबरोबर एखाद्या चांगल्या ठिकाणी भेट द्यायला जाऊ शकता. तुम्ही केलेल्या कामांचं आज तुम्हाला बक्षीसही मिळेल. त्याचबरोबर मालमत्तेच्या गोष्टीत कठोर निर्णय घेऊ नका. डोकं शांत ठेवून प्रत्येक गोष्टीचा विचार करा.
कर्क
कर्क राशींचे व्यक्ती आज थोडे विचलित असतील. तुम्ही तुमच्या जोडीदाराला प्रसन्न ठेवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करू शकता. आज आरोग्याची विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे नाहीतरी येणाऱ्या दिवसांत आजारी पडू शकता. स्वतःला बदलविण्यात लक्ष द्या, दुसऱ्यांच्या विचार करू नका आणि जास्तीत जास्त शांत राहण्याचा प्रयत्न करा.
सिंह
सिंह राशीच्या स्वाती व्यक्तींच्या आयुष्यात आनंदमय गोष्टी घडू शकतात. जुने मित्र-मैत्रिणी भेटण्याची शक्यता आहे. व्यापारकर्ते सणासुदीक्षा निमित्ताने चांगला नफा कमवतील. त्याचबरोबर सिंह राशींच्या व्यक्तींना नोकरीच्या नवनवीन संधी उपलब्ध होण्याची देखील शक्यता आहे. संधी न गमावता या संधीचा सोनं करा. आयुष्यभर खुश रहाल.
कन्या
कन्या राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात आज नातेवाईकांकडून मन दुखावले जाऊ शकते. नातेसंबंध जोडून ठेवण्यास अथक परिश्रम घ्यावे लागतील. सुखाप्रमाणे दुःखही स्वीकारता आलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला दोन्ही बाजूंनी विचार करणे गरजेचे आहे. आज दिवसभरात धनलाभ होण्याची शक्यता आहे.
तुळ
तूळ राशींना आज नोकरीच्या त्याचबरोबर व्यवसायाच्या नवीन संधी आणि आयडियाज मिळतील. मित्रांचे चांगले सहकार्य लाभेल. आजचा दिवस प्रचंड उत्साहात आणि आनंद जात जाईल. आज तुम्ही बाहेर फिरण्याचा प्लॅन देखील करू शकता. त्याचबरोबर कुटुंबाबरोबर देखील वेळ घालवू शकता.
धनु
आज पैसा येण्याचे मार्ग सापडतील. परंतु पैशांचे व्यवस्थित नियोजन आणि व्यवस्थापन करणे देखील तितकेच गरजेचे आहे. अन्यथा तुमच्या लोभापोटी चांगली संधी गमावून बसाल. आजचा दिवस अत्यंत उत्साहात आणि आनंदात घालवाल. दिवसाची सुरुवात देवी लक्ष्मीच्या नावाने करा.
मकर
मकर राशींच्या व्यक्तींच्या आयुष्याचा आज उत्सवाचा आणि उत्स्फूर्तिचा दिवस आहे. जिथे जाल तिथे मंगलमय वातावरण कराल. आज तुमच्याकडून एखाद्याच्या चेहऱ्यावर हास्य उमटेल. व्यवसायासंबंधी चांगल्या बातम्या कानावर येतील.
कुंभ
कुंभ राशींच्या व्यक्तींना कायम असं वाटत असतं की, माझ्या मदतीला कोणीही धावून येत नाही. परंतु तुम्ही स्वतःला एखाद्या कामामध्ये इतकं झोकावून देता की, दुसऱ्यांना कोणताच काम उरत नाही. यासाठी तुम्ही मदत मागण्याचा संकोच करू नका. आजचा दिवस अत्यंत आनंदात आणि मजेत जाईल. मित्र-मैत्रिणीचं चांगलं सहकार्य आज लागेल. बॉसकडून विशेष कौतुक होण्याची शक्यता आहे.
मीन
आज तुम्हाला व्यवसायात एक चांगली डेली येण्याची शक्यता दिसत आहे. आज जोडीदाराबरोबर अत्यंत चांगला दिवस जाईल. तुम्ही आज शॉपिंगला देखील जाऊ शकता. तुमच्या राशीत आज धनलाभ देखील लिहिला आहे. त्याचबरोबर वसुबारस सुरू असल्यामुळे गोमातेला अन्न खाऊ घाला दिवस चांगला जाईल.
Latest Marathi News | Horoscope Today 28 October 2024 Marathi News.
