2 May 2025 12:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर देईल मोठा परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC Suzlon Share Price | स्वस्त आणि मस्त शेअर, खरेदी करून होल्ड करून ठेवा, संयम आयुष्य बदलू शकतं - NSE: SUZLON Rattan Power Share Price | 10 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, मिळेल मजबूत अपसाईड परतावा - NSE: RTNPOWER Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा
x

Ketu Rashi Parivartan | या 3 राशींचे नशीब पालटणार केतू राशी परिवर्तन, यातील तुमची राशी कोणती? केतू परिवर्तनाची अशी होईल कृपा

Ketu Rashi Parivartan

Ketu Rashi Parivartan | वैदिक शास्त्रानुसार केतूला छाया ग्रह मानले जाते. इतर ग्रहांप्रमाणे केतूदेखील वेळोवेळी राशीबदल करतो आणि केतूचे संक्रमण महत्त्वाचे मानले जाते. केतू ग्रह शुभ स्थितीत असताना व्यक्तीला जीवनात सुख-समृद्धी जाणवते. त्याचबरोबर केतूची अवस्था वाईट असेल तर जीवन दु:खाने भरून जाऊ शकते.

ऑक्टोबर महिन्यात केतू राशी परिवर्तन करणार आहे, ज्यामुळे काही राशींसाठी शुभ परिणाम तर काहींसाठी अशुभ परिणाम देखील येऊ शकतात. 30 ऑक्टोबरला केतू तुळ राशीतून कन्या राशीत प्रवेश करणार आहे. केतूचे हे संक्रमण काही राशींसाठी शुभ मानले जाते.

मेष राशी
मेष राशीच्या व्यक्तींसाठी केतूचे राशीपरिवर्तन फायदेशीर ठरू शकते. केतू मेष राशीच्या सहाव्या भावात गोचर करणार आहे. अशा तऱ्हेने मेष राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. जोडीदारासोबतच्या प्रेमसंबंधात गोडवा येईल. त्याचबरोबर बिझनेसमध्ये तुम्ही अशा योजना आखायला हव्यात, ज्यामुळे तुमच्यासाठी दीर्घकाळात चांगली गुंतवणूक होईल. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ व्यतीत कराल.

वृश्चिक राशी
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी केतूचे हे संक्रमण शुभ मानले जाते. केतू तुमच्या राशीच्या अकराव्या भावात भ्रमण करणार आहे. केतूच्या शुभ प्रभावाने रखडलेली कामे मार्गी लागतील. व्यवसायात चांगली डील मिळू शकते. पैसे येण्याची ही शक्यता आहे. त्याचबरोबर अनावश्यक खर्च टाळावेत. आपल्या आरोग्याकडे आणि आईच्या आरोग्याकडे लक्ष द्या आणि तणावापासून दूर राहा.

कर्क राशी
कर्क राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर महिन्यात केतूचे संक्रमण लाभदायक मानले जाते. केतू तुमच्या राशीत तिसऱ्या भावात भ्रमण करणार आहे. या काळात कोणतेही नवीन काम सुरू करणे आपल्यासाठी शुभ राहील. भावंडांसोबतच्या नात्यातील कटुता दूर होऊ लागेल. पैशांशी संबंधित प्रश्न हळूहळू मिटण्यास सुरवात होईल. कुटुंबातील सदस्यांसमवेत सहलीला जाऊ शकता. आरोग्याची काळजी घ्या.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Ketu Rashi Parivartan effect on these 3 zodiac signs 24 September 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Ketu Rashi Parivartan(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या