4 May 2024 4:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर BHEL Share Price | भरवशाचा PSU शेअर! अल्पावधित दिला 258% परतावा, कंपनीबाबत अजून एक सकारात्मक अपडेट Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीचा मोठा निर्णय, 1 वर्षात 414% परतावा देणारा स्टॉक कोसळणार की तेजीत येणार? Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर पुढे किती फायद्याचा ठरणार? तेजीत येणार? Buy करावा की Sell? Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरची घसरण थांबेना! स्टॉक नेमका घसरतोय का? तपशील जाणून घ्या
x

Loan Recovery Rules | आता तुमचे बॅंकेचे EMI थकले तरी डोन्टवरी, कर्जदाराला आरबीआयने दिलेले महत्वाचे अधिकार लक्षात ठेवा

Highlights:

  • Loan Recovery Rules
  • कर्जदाकाला अनेक अधिकार प्रदान
  • बॅंकेने ही चूक केल्यास नोंदवा तक्रार
  • गैरवर्तन करण्याचा अधिकार नाही
Loan Recovery Rules

Loan Recovery Rules | मुलांचे शिक्षण, आजारपण, लग्न, व्यवसाय, घर अशा विविध कारणांसाठी आपण बॅंकेतून कर्ज घेत असतो. कर्ज घेतल्यावर आपण त्यासाठी काही गोष्टी बॅंकेत हमी म्हणून ठेवतो. अशात कर्जाची परतफेड करण्यासाठी मुदत ठरवून दिलेली असते. यात तुम्ही वेळेवर कर्ज भरणे गरजेचे आहे.

मात्र काही कारणास्तव तुम्ही कर्जाचे काही हप्ते भरले नाही तर लगेचच बॅंकेतून मॅसेज आणि कॉल येण्यास सुरुवात होते. अशात अनेकदा बॅंकेच्या वसूली डिपार्टमेंटमधील कर्मचारी धमक्यांचे फोन करतात. या त्रासाने अनेक व्यक्ती डिप्रेशनमध्ये जातात आणि कर्जाच्या डोंगरामुळे जिवही देतात. मात्र आता भारतीय रिझर्व बॅंकेने कर्ज घेणा-या व्यक्तींसाठी काही नियम आणले आहेत.

कर्जदाकाला अनेक अधिकार प्रदान

या नविन नियमावलीने कर्जदाकाला अनेक अधिकार प्रदान केले आहेत. त्यामुळे जर आता तुम्ही घेतलेल्या कर्जाचे काही हप्ते भरण्यास असक्षम राहीलात तर चिंता करण्याचे काही कारण नाही. जर तुम्हाला बॅंकेतील कर्मचारी धमकीचे फोन करत असेल तर त्याच्या विरोधात तुम्ही कारवाई करु शकता. यात तुम्ही त्या व्यक्तीची पोलिसांत तक्रार नोंदवू शकता.

त्यामुळे बॅंकेचे तुमच्यासाठी असलेले आधिकार तुम्हाला माहीत असने गरजेचे आहे. अनेकांना कर्ज घेतल्यावर बॅंका विविध ऑफर देत असतात. जशी कर्ज घेण्याआधी तुम्ही वेगवेगळी चौकशी करता तशीच हप्ते भरताना देखील ते बुडाल्यास तुम्हाला असलेल्या अधिकारांची माहिती मिळवायला हवी.

बॅंकेने ही चूक केल्यास नोंदवा तक्रार

प्रत्येक बॅंकेला आपले कर्ज वसूल करण्यासाठी विशिष्ठ अधिकार देण्यात आले आहेत. मात्र त्याच बरोबर काही अटी देखील घालण्यात आल्या आहेत. कोणतीही बॅंक कर्ज वसूल करताना या नियमांचे उलंघन करु शकत नाही. समजा तुम्ही कर्जाचे काही हप्ते भरले नाही तर बॅंक त्यांच्या कारवाईसाठी तुम्हाल सकाळी ७ ते सायंकाळी ७ याच वेळेत कॉल करु शकते. तसेच याच वेळेत तुमच्या घरी यासाठी चौकशी करु शकते. मात्र ७ नंतर किंवा ७ आधी तुम्हाला कॉल केला अथवा बॅंकेतील कोणता कर्मचारी तुमच्या घरी आला तर तुम्ही त्याच्या विरोधात पोलिसांत तक्रार नोंदवू शकता.

गैरवर्तन करण्याचा अधिकार नाही

कोणताही बॅंक कर्मचारी तुमच्याकडून कर्ज वसूल करताना तुमच्याशी गैरवर्तन करु शकत नाही. यात जेव्हा तुम्ही कर्ज घेता तेव्हा बॅंकेत तुमच्या मालमत्तेचे कागदपत्र जमा करावे लागतात. त्यामुळे कर्जाचे सलग ३ हप्ते थकले असतील तर बॅंक आधी नोटीस बजावते. त्यानंतर तुम्हाला २ महिन्यांचा अवधी दिला जातो.

मात्र या कालावधीत देखील कर्ज भरण्यास तुम्ही असक्षम असाल तर तुमची मालमत्ता बॅंक जप्त करते. त्यामुळे कर्ज वसूलीसाठी बॅंकेकडून तुम्हाला धमकी देणे किंवा मानसीक आणि शारीरीक त्रास देण्यास सक्त मनाई आहे. कोणतीही बॅंक असे करु शकत नाही. जर तुमच्याबरोबर बॅंकेने असे केले तर तुम्ही कारवाई करु शकता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Loan Recovery Rules If the bank installments are exhausted now no worry RBI 24 September 2023.

हॅशटॅग्स

Loan Recovery Rules(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x