20 May 2024 4:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | 1660 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, पुढेही मालामाल करणार Patel Engineering Share Price | 58 रुपयांचा शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल 37 टक्केपर्यंत परतावा HAL Share Price | तज्ज्ञांचा HAL शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, बक्कळ कमाई होईल, किती टक्के परतावा मिळेल? NMDC Share Price | PSU NMDC स्टॉकला तज्ज्ञांची 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मोठी कमाई, किती फायदा होईल? Tata Motors Share Price | तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राइस जाहीर JP Power Share Price | 19 रुपयाचा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, यापूर्वी दिला 680% परतावा, संधी सोडू नका Rattan Power Share Price | हा शेअर श्रीमंत बनवणार! प्राईस 13 रुपये, 1 महिन्यात दिला 60% परतावा, खरेदी करा
x

Tinna Rubber Share Price | मागील 3 वर्षात टीना रबर शेअरने 2865 टक्के परतावा दिला, आज स्टॉक 11% वाढला, खरेदी करावा का?

Tinna Rubber Share Price

Tinna Rubber Share Price | टीना रबर अँड इन्फ्रास्ट्रक्चर या विशेष रासायन क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीने मोठी घोषणा केली आहे. ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत बोनस शेअर्स वाटप करण्याबाबतची चर्चा सुरू असल्याची माहिती दिली आणि यानंतर गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात स्टॉक खरेदीला सुरुवात केली. (Tinna Share Price)

मागील आठवड्याच्या शुक्रवारी टीना रबर अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स 7 टक्के वाढीसह 603.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 10 जुलै 2023 रोजी टीना रबर अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स 11.24 टक्के वाढीसह 671.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

बोनस शेअर्स निर्णय :

सेबीला दिलेल्या माहितीत, टिन्ना रबर अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने कळवले आहे की, टीना रबर अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 29 जुलै 2023 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत 30 जून 2023 रोजी संपलेल्या तिमाही निकालावर चर्चा केली जाईल. याशिवाय कंपनीच्या इक्विटी शेअर धारकांना बोनस शेअर्स वाटप करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. टीना रबर अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आपले अधिकृत भाग भांडवल 10 कोटींवरून वाढवून 20 कोटी रुपयेवर नेण्याचा विचार करत आहे. टीना रबर अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने मार्च 2023 तिमाहीत 72.72 कोटी रुपये विक्री नोंदवली होती.

कंपनीची आर्थिक कामगिरी :

मार्च 2022 मध्ये टीना रबर अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने 64.03 कोटी सेल्स साध्य केले होते. तर मार्च 2023 तिमाहीत कंपनीने 6.07 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मागील वर्षीच्या याच कालावधीत 4.70 कोटी रुपये निव्वळ नफ्याच्या तुलनेत मार्च 2023 तिमाहीत 29.37 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. मार्च 2023 तिमाहीत कंपनीचा EBITDA 5.8 टक्के वाढीसह 10.76 कोटी रुपये नोंदवला गेला होता.

तीन वर्षांचा परतावा :

मागील तीन वर्षात टीना रबर अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 2865 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील दोन वर्षांत लोकांनी 645 टक्के नफा कमावला आहे. मागील एका वर्षात टीना रबर अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 100 टक्के नफा कमावून दिला आहे. 1 सप्टेंबर 2022 रोजी हा कंपनीचे शेअर्स 725.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज हा स्टॉक 671 रुपयेवर ट्रेड करत आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्याची उच्चांक पातळी किंमत 725.80 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tinna Rubber Share Price today on 10 July 2023.

हॅशटॅग्स

Tinna Rubber Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x