11 December 2024 2:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | वेदांता शेअरने विक्रमी उच्चांक गाठला, पुढे रॉकेट तेजी, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल IPO GMP | आला रे आला IPO आला, गुंतवणुकीची मोठी संधी, पहिल्याच दिवशी मिळेल मोठा परतावा - GMP IPO 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, जानेवारी 2025 मध्ये महागाई भत्ता इतका वाढणार, अपडेट आली Shukra Rashi Parivartan | डिसेंबरच्या 'या' तारखेपासून शुक्र गोचरमुळे काही राशींना भोगावे लागू शकतात गंभीर परिणाम
x

Toll Tax | हायवे प्रवाशांसाठी अपडेट, या लोकांना टोल टॅक्स भरावा लागणार नाही? सरकारकडून मोठी माहिती

Toll Tax

Toll Tax | तुम्हीही हायवेवरून प्रवास करणार असाल किंवा प्रवासाचा बेत आखत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. अलीकडे एक मेसेज समोर येत आहे, ज्यामध्ये काही लोकांना सरकारकडून करसवलत मिळेल, म्हणजे त्या लोकांना टोल टॅक्स भरावा लागणार नाही, असं म्हटलं जात आहे.

पीआयबीने ट्विट केले आहे
पीआयबीने आपल्या अधिकृत ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, व्हॉट्सअॅप मेसेजमध्ये असा दावा केला जात आहे की, भारतातील सर्व टोल प्लाझावर पत्रकारांना टोल टॅक्सवर सूट मिळेल, त्यासाठी ओळखपत्र दाखवणं आवश्यक असेल.

अधिकृत लिंक तपासा
याबाबत अधिक माहितीसाठी तुम्ही https://morth.nic.in/sites/default/files/faqs_exemptions.pdf ऑफिशियल लिंकला भेट देऊ शकता.

टोल करात सवलत कोणाला
पीआयबीने एक लिंक शेअर केली आहे, ज्यामध्ये भारतात कोणत्या लोकांना टोल टॅक्समधून सूट मिळते याची माहिती देण्यात आली आहे. यात भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान, सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयांचे न्यायाधीश, लोकसभा राज्यसभा सभापती व खासदार इत्यादींचा समावेश आहे. यासोबतच रुग्णवाहिका आणि हर्से व्हॅन यांनाही टोल करातून सूट देण्यात आली आहे.

हा दावा पूर्णपणे बनावट आहे
सरकारकडून काही लोकांसाठी टोल टॅक्समध्ये सूट दिली जात आहे की नाही. हा दावा पूर्णपणे बनावट असल्याचे पीआयबीने फॅक्ट चेकनंतर म्हटले आहे. असा कोणताही आदेश एमओआरटीएच इंडियाने दिलेला नाही.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Toll Tax updates from government check details on 18 November 2022.

हॅशटॅग्स

#Toll Tax(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x