28 March 2023 1:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Interest Rate Hike | नोकरदारांसाठी खुशखबर! ईपीएफ व्याज दर वाढवले, आता किती फायदा मिळणार पहा Income Tax Cash Rules | बापरे! आता 2 लाख रुपयांपेक्षा जास्त रोख रकमेच्या खरेदीवर कागदपत्रे द्यावी लागणार VIDEO | भ्रष्टाचार दडविण्यासाठी लोकशाही ताब्यात घेण्याचा प्रयन्त, मोदींच्या मित्राने कायदाच बदलला, इस्रायली पंतप्रधांच्या अटकेसाठी जनता रस्त्यावर IRCTC Confirmed Train Ticket | तिकिटचे टेन्शन नाही! रेल्वेत बुकिंगवेळी कन्फर्म सीट मिळेल, बुकिंग करताना काय करावं पहा Tax Exemption Claim | तुमच्या पगारात DA, TA, HRA सह इतर अनेक भत्ते असतात, कशावर किती टॅक्स सूट मिळते पहा SBI FD Vs SBI Annuity Deposit Scheme | दर महिन्याला कमाईसाठी SBI ची कोणती योजना बेस्ट? दर महिन्याचा खर्च भागेल Ration Card Updates | रेशनकार्डमध्ये नव्या सदस्याचे नाव जोडायचयं, महत्वाची अपडेट, आत्ताच ही काळजी घ्या
x

केसरकरांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरेंसोबत भगवी लाट | कोकण दौऱ्यात प्रचंड गर्दी आणि समर्थन मिळतंय

Aaditya Thackeray

Aaditya Thackeray | आदित्य ठाकरे यांच्या कोकण दौऱ्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. तरुण, महिला ते ज्येष्ठ नागरिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. आदित्य ठाकरे म्हणाले रात्रभर याचा विचार मनात येतो. उद्धव साहेबांना सांभाळून घ्यायची वेळ होती, त्यावेळी तुम्ही निर्लज्जपणे निघून गेला. आम्ही डोळे बंद करून मिठी मारली पण पाठीत खंजीर खुपसला. हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरं जा मग बघू सत्य जिंकते की सत्ता जिंकते, असं म्हणत शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांचं नाव न आव्हान दिले. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे कोकणाच्या दौऱ्यावर आहे. आज सावंतवाडीमध्ये आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रा पोहोचली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर घणाघाती प्रहार केला.

गद्दारांच्या सरकारने स्थगिती दिली :
‘चिपी विमानतळाचे काम आपण केले आहे. आता श्रेयवादासाठी आणि श्रेय घेण्यासाठी इकडून तिकडून कुणी तरी पुढे आले आहे. आपण कोकणासाठी अनेक काम केले निधी मंजूर केला. पण, त्या कामांना या बेकायदेशीर आणि गद्दारांच्या सरकारने स्थगिती दिली. पण, हे सरकार एक दीड महिन्यात कोसळणार आहे, हे लिहून घ्या, महाराष्ट्र अशी गद्दारी कधीच खपवून घेणार नाही, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.

मुंबईची ओळख पुसण्याचे काम :
राज्यपालांनी मुंबईची ओळख पुसण्याचे काम केले आहे. मुंबई आणि ठाणे निवडणुका आहेत म्हणून राज्यपालांनी नावे घेतली. कोणत्याही समाजामध्ये भांडण नाही. लोकांमध्ये वाद नाही. पण त्यांच्यामध्ये वाद निर्माण केल्याचे काम केले जात आहे. सगळे चांगले सुरू असताना तुकडे पाडणारी लोक आली आहे, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी राज्यपालांवर टीका केली.

ठाकरे परिवार समोर उभा आहे :
ठाकरे परिवार समोर उभा आहे, संपू शकत नाही. महाराष्ट्राला संपवण्याचे राजकारण सुरू आहे, त्याला 40 निर्लज्ज गद्दार फसले. माझ्या मनात यांच्या बदल राग नाही. पण जे सोडून गेलेत त्यांच्या मनात द्वेष आहे हे दिसून येत आहे. आम्ही त्यांना सर्व दिले, वैयक्तिक पदं दिली, मंत्रिपदं दिली, सगळं काही दिलं. पण आमच्या पाठीत का खंजीर का खुपसला हा प्रश्न आजही मनात आहे. उद्धव साहेबांना सांभाळून घ्यायची वेळ होती, त्यावेळी तुम्ही निर्लज्जपणे निघून गेला. गरजेपेक्षा जास्त दिले याचे अपचन झाले आहे याचा राग असेल म्हणून पक्ष फोडत आहेत. तुम्हाला जायचे आहे तर जा दडपणे दूर करून खुश राहा. लाज असेल तर राजीनामा द्यावा आणि निवडून या, अशी टीकाही आदित्य ठाकरेंनी केली.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Aaditya Thackeray on Konkan Tour check details 01 August 2022.

हॅशटॅग्स

#AadityaThackeray(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x