1 May 2025 4:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, हि आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATAMOTORS Vodafone Idea Share Price | मोठी बातमी, पेनी स्टॉकमध्ये दिसू शकते मोठी तेजी, महत्वाची अपडेट आली - NSE: IDEA Vedanta Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल असलेला शेअर खरेदी करा; मोठा परतावा मिळेल - NSE: VEDL HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्समध्ये दिसणार तुफानी तेजी, संधी सोडू नका, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: HAL Trident Share Price | 26 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, महत्वाचे संकेत, यापूर्वी 5238% परतावा दिला - NSE: TRIDENT NTPC Share Price | 461 टक्के परतावा देणारा एनटीपीसी स्टॉक पुन्हा फोकसमध्ये, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NTPC HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO
x

हम करे सो कायदा? | राज्यात चाललंय काय? | घटनेतील कलम 164 (1A) दुर्लक्षित करत शिंदे-फडणवीसांची कॅबिनेट बैठक?

CM Eknath Shinde

CM Eknath Shinde | महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आलं आहे. महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्याने २९ जूनला उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला. त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. ३० जूनला झालेल्या या शपथविधीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज कॅबिनेटची बैठक झाली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन कॅबिनेटमध्ये घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली. औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजी नगर, उस्मानाबादचे नामांतर धाराशीव करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं. मागचं सरकार अल्पमतात होतं. त्यामुळे अल्पमतातील सरकारने घेतलेले निर्णय अवैध असतात. म्हणून नव्याने प्रस्ताव आणून हा निर्णय घेतल्याचं फडणवीस यांनी सांगितलं होतं. मात्र, आता शिंदे-फडणवीस यांनीच घेतलेले कायदे संविधान विरोधी असल्याचं हरी नरके यांचं म्हणणं आहे.

भारतीय राज्यघटनेतील कलम 164 (1A) :
भारतीय राज्यघटनेच्या कलम 164 (1A) नुसार राज्याचे मंत्रिमंडळ किमान 12 मंत्र्यांचे असणे बंधनकारक आहे. त्यापेक्षा कमी संख्येचा मंत्रिमंडळाला संविधानाची मान्यता नाही. त्यामुळे गेले 2 आठवडे महाराष्ट्रात 2 मंत्र्यांचे मंत्रीमंडळ जे निर्णय घेतेय त्याला घटनात्मक वैधता नाही, असा दावा हरी नरके यांनी ट्विट करून केला आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारने घेतलेले निर्णय बेकायदा आहेत का? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे. मात्र, या तिन्ही बैठका बेकायदेशीर असल्याचा दावा ज्येष्ठ विचारवंत, प्रा. हरी नरके यांनी ट्विट करून नमूद केले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: CM Eknath Shinde and DCM Devendra Fadnavis took cabinet meeting ignoring constitution said Hari Narke check details 16 July 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CM Eknath Shinde(90)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या