26 July 2021 4:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Special Recipe | विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी Sarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा जळगावमध्ये मोठं राजकीय नुकसान झाल्यानंतर मनसेची पुन्हा शाखा आणि पक्षविस्ताराला सुरुवात Sarkari Naukri | आयकर विभाग, मुंबईत 155 पदांची भरती | १० शिक्षण | पगार ५६ हजार कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत | संध्याकाळपर्यंत घोषणा तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे | मुख्यमंत्र्यांचं चिपळूणमधील व्यापाऱ्यांना आश्वासन Special Recipe | तर्री वाल जत्रे प्रमाणे झणझणीत मटण घरच्याघरी बनवा - वाचा रेसिपी
x

विकृतीचा कळस गाठणाऱ्या आघाडी-बिघाडी फेसबुक पेज विरोधात संताप वाढतो आहे? सविस्तर

facebook, Aghadi Bighadi, NCP, MNS, Sharad Pawar, Raj Thackeray

मुंबई : सध्या समाज माध्यमं हा एखादा विषय चिघळविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. मात्र विषयाला अनुसरून होणारी टीका समाज माध्यमं देखील स्वीकारतात, मात्र यात अनेक फेसबुक पेजेस विकृतीचा कळस गाठताना दिसत आहेत. त्यात सर्वाधिक संताप हा ‘आघाडी-बिघाडी’ या पेजविरोधात होताना दिसत आहे. विशेष म्हणजे यावर मार्केटिंगसाठी मोठ्या प्रमाणावर पैसा देखील खर्च केला जात असल्याचं निदर्शनास आलं आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांविरोधात “आघाडी-बिघाडी’ या फेसबुक पेजवरून मोहीम राबविली जात आहे. यातून नेत्यांची विचित्रपणे बदनामी करण्यात आली होती. याविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. असे “कॅम्पेन’ राबवून पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचे प्रयत्न होत आहेत. याला वेळीच आवर घालण्यासाठी पेज ऍडमिनवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पक्षाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली होती. मात्र संधीत पेजचा सत्ताधाऱ्यांशी तर काही संबंध नाही ना अशी शंका उपस्थित केली जात आहे. कारण त्यावर खर्च होणारा पैसा पाहता एखादी एजन्सी हे काम करत असावी अशी शक्यता अधिक बळावली आहे.

पोलीस तक्रार झाल्यानंतर देखील या पेजवरून होणारी विखारी मार्केटिंग पाहता यामध्ये सामान्य व्यक्ती सामील नसावी अशी शक्यता अधिक आहे. कारण पोलीस तक्रार झाल्यानंतर या पेजवरून अजूनच विखारी प्रकार सुरु झाले आहेत. त्यात शरद पवार, अजित पवार आणि राज ठाकरे यांना विशेष लक्ष केलं जात असून, संदर्भहीन ग्राफिक्स प्रसिद्ध करण्यात येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सैनिकांमध्ये देखील संतापाची लाट आहे. पोलिसांना सुगावा लागू नये म्हणून वेबसाईट देखील बंद करण्यात आली असून, फेसबुक पेजवरून मार्केटिंग अजून जोरात सुरु केलं असून, विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बदनामी करण्यासाठीच ते बनवले असावे अशी शक्यता सुनावली आहे. विरोधकांनी याची वेळीच दखल न घेतल्यास त्याचे निवडणुकीत परिणाम भोगावे लागतील, कारण असेच विषय प्रसार माध्यमांवर अधिक चर्चेला येत असल्याने मूळ विषयांवरून मतदाराचे मन वळविले जाऊ शकते आणि भलतीच चर्चा रंगवली जाईल अशी शक्यता दुणावतो आहे. त्यात पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने विरोधकांनी देखील युतीच्या नावाने फेसबुक पेज बनवलं असलं तरी अजून तिथे कळस गाठला गेलेला नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x