27 July 2024 11:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | सरकारी योजनेत फायदाच फायदा! 95 रुपयांच्या बचतीवर मिळतील 14 लाख रुपये, संधी सोडू नका Reliance Power Share Price | कर्जमुक्त कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर 'पॉवर' दाखवणार, 29 रुपयांचा शेअर खरेदीला गर्दी Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा HFCL Share Price | 5G संबंधित HFCL सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा
x

निवडून येणारे शिंदेंसोबत | पण त्यांना निवडून आणणारे पदाधिकारी, कार्यकर्ते उद्धव ठाकरेंसोबत | पदाधिकाऱ्यांना राजकीय संधी

CM Uddhav Thackeray

Uddhav Thackeray | शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीला शिवसेना भवनात सुरुवात झाली असून या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. शिवसेनेत अभूतपूर्व झालेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार आहे. या बैठकीत शिवसेना नेते पदावरून एकनाथ शिंदे आणि रामदास कदम यांचीही हकालपट्टी होणार असल्याची शक्यता आहे.

फुटीरतावाद्यांवर कारवाई होणार :
शिवसेना फुटीरतावाद्यांवर कारवाई करण्याच्या दृष्टीने आता शिवसेनेकडून पावले उचलली जात आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडखोर गटाने ‘शिवसेना- बाळासाहेब ठाकरे’ असे नाव आपल्या गटाला दिले असल्याचे वृत्त आहे.

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक :
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक होणार आहे. शिवसेनेच्या घटनेनुसार आता एकनाथ शिंदे आणि रामदास कदम यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. एकनाथ शिंदे आणि रामदास कदम हे शिवसेना नेते पदावर आहेत. आता, त्यांची या पदावरून हकालपट्टी करण्यात येण्याची शक्यता आहे. या कारवाईने त्यांच्यावरील दबाव वाढवण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून सुरू आहे.

शिंदेंनी आमदारांची एक एक करून भेटली घेतली :
एकनाथ शिंदे यांच्यासह भरत गोगावले, दादा भुसे, गुलाबराव पाटील यांनीही सर्व आमदारांची एक एक करून भेटली घेतली. यावेळी सर्व आमदारांना आपल्या कुटुंबीयांसोबत बोलायला सांगितलं. तसंच सांगण्यात आलं की, ‘कार्यकर्त्यांना सांगा आजही आम्ही शिवसेनेतच आहोत. बाळासाहेबांचे विचार सोडलेले नाहीत’. यासोबतच ‘विधानसभा उपसभापतींना तो अधिकार नसल्याने आपल्यावर अपात्र कारवाई करता येणार नाही, असं आश्वासन सर्व आमदारांना देण्यात आलं.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: CM Uddhav Thackeray called meeting of Shivsena check details 25 June 2022.

हॅशटॅग्स

#Eknath Shinde(96)#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x