27 September 2022 2:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | या स्वस्त शेअरच्या संयमी गुंतवणूकदारांची लॉटरीच लागली, 1 लाखाच्या गुंतवणुकीवर 3.85 कोटी परतावा, नाव सेव्ह करा Viral Video | गायीने ATM मशीन सेंटरचा बनवला गोठा, पैसे काढताना ग्राहकांवर तोंडाला रुमाल लावायची वेळ, पहा व्हिडिओ Multibagger Stocks | हा स्टॉक मंदीतही पैसा वेगाने वाढवतो, तज्ञांनी दिली टार्गेट प्राईस, टॉप ब्रोकरेजचा खरेदीचा सल्ला Infinix Zero Utra 5G Smartphone | 200MP कॅमेरासह इन्फिनिक्स झिरो अल्ट्रा 5G स्मार्टफोन लाँच होणार, फीचर्स आणि किंमत पहा WAPCOS IPO | वापकोस कंपनी आयपीओ लाँच करणार, गुंतवणुकीपूर्वी कंपनीचा तपशील जाणून घ्या Private Employee Salary Hike | खाजगी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होऊ शकते?, रिपोर्ट प्रसिद्ध झाला Zomato Share Price | झोमॅटो शेअरच्या गुंतवणूकदारांची धाकधूक थांबेना, थेट 60 रुपयांवर आला, पुढे काय होणार जाणून घ्या
x

Eknath Shinde | शिवसेना-भाजपची युती सध्यातरी अशक्य | उद्धव ठाकरे कोणता धाडसी निर्णय घेणार?

Eknath Shinde

Eknath Shinde | विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे शिवसेनेत राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. याचा फटका राज्यातील सरकारलाही बसू शकतो. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी शिवसेनेकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

37 आमदार शिंदेंसोबत असले तर :
एकनाथ शिंदे यांनी जर 37 आमदार आपल्या बाजूने केले तर महाविकास आघाडी सरकार पडण्याची शक्यता आहे. पक्षांतर विरोधी कायद्यानुसार, ब्रेकवे गट तयार करण्यासाठी 2/3 सदस्यांचे समर्थन आवश्यक असते. एकनाथ शिंदेंकडे सध्या 26 आमदारांचे समर्थन असल्याची चर्चा आहे. शिंदेंसोबत सुरतमध्ये 26 आमदार असल्याची एक यादी व्हायरल झाली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंना नवा गट स्थापन करण्यासाठी 11 आमदारांची गरज लागू शकते.

शिवसेना-भाजप एकत्र येण्याची शक्यता किती :
शिवसेना-भाजपमध्ये मागच्या अनेक दिवसांपासून संघर्ष सुरु आहे. शिवसेना नेते मागच्या काही काळापासून ईडीच्या रडारवर आहेत. आनंदराव अडसूळ, भावना गवळी, प्रताप सरनाईक, संजय राऊत, अनिल परब यांसारखे शिवसेनेचे महत्त्वाचे ईडीच्या रडारवर आहेत. भाजप सरकार केंद्रीय तपास यंत्रणांच्या मदतीने वार करत असल्याची टीका वारंवार शिवसेना नेत्यांनी केली आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपची युती सध्यातरी शक्य नाही.

मध्यावधी निवडणुका होतील का :
एकनाथ शिंदेंसोबत असलेल्या गटाने जर सरकारसोबतचा पाठिंबा काढून घेतला आणि भाजपने जर त्यांच्यासोबत सरकार स्थापन करण्याचा दावा केला तर अविश्वास प्रस्ताव आणून नवे सरकार स्थापन करण्याचा दावा केला जाऊ शकतो. फडणवीसांनी सरकार स्थापन करण्यास नकार दिल्यावर राज्यपाल राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करतील आणि त्यानंतर मध्यावधी निवडणुका होतील. मध्यावधी निवडणुकांची प्रक्रिया सध्यातरी अवघड आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Eknath Shinde against Shivsena check details here 21 June 2022.

हॅशटॅग्स

#Eknath Shinde(92)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x