13 December 2024 2:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

Eknath Shinde | शिंदेंच्या नावाने 'भाजपने दिले स्क्रिप्टेड प्रस्ताव'? | सत्तेसाठी कोणाकडे किती संख्याबळ पहा

Eknath Shinde

Eknath Shinde | महाराष्ट्राच्या राजकारणात आज खूप मोठा भूकंप घडू शकतो. कारण महाविकास आघाडी सरकार संकटात सापडलं आहे. शिवसेनेचे बडे नेते एकनाथ शिंदे यांनी 35 आमदारांसह पक्षाविरोधात बंड पुकारलं आहे. शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जवळचे सहकारी मिलिंद नार्वेकर हे स्वत: एकनाथ शिंदे यांची समजूत काढण्यासाठी गुजरातला गेले आहेत. गुजरातच्या एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे हे त्यांच्या समर्थक आमदारांसह थांबले आहेत.

मिलिंद नार्वेकर आणि एकनाथ शिंदेंची भेट :
तिथे मिलिंद नार्वेकर त्यांची भेट घेण्यासाठी गेले. विशेष म्हणजे नार्वेकर गेले तेव्हा त्यांना हॉटेलमध्ये आत प्रवेश दिला गेला नाही. हॉटेल प्रशासनासोबत बराच वेळ चर्चा केल्यानंतर अखेर एकनाथ शिंदे हे मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी तयार झाले. दोन्ही नेत्यांमध्ये सलग अर्धा तास चर्चा झाली. या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत परतण्याची इच्छाच नसल्याचं मत व्यक्त केलं. त्यामुळे शिवसेनेसाठी पुढची वाट ही प्रचंड खडतर असल्याचं मानलं जात आहे.

एकनाथ शिंदे 35 आमदारांसह सत्तेतून बाहेर :
एकनाथ शिंदे 35 आमदारांसह सत्तेतून बाहेर पडलं तर महाविकास आघाडी कोसळण्याची दाट शक्यता आहे. याशिवाय यामुळे शिवसेनेत मोठी फूट पडण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापुढे सत्ता टिकविण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.

विधानसभेत भाजपचे 106 आमदार :
महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीनंतर विधानपरिषद निवडणुकीतही महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी असलेल्या पक्षांच्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचं समोर आलं होतं. विधानसभेत भाजपचे 106 आमदार आहेत. अपक्षांसह ही संख्या 113 पर्यंत पोहोचली होती. पण भाजपने राज्यसभा निवडणुकीत 123 आणि विधान परिषद निवडणुकीत 134 मते मिळवली होती.

महाराष्ट्र विधानसभेचं नेमकं गणित काय :
महाराष्ट्र विधानसभेत एकूण 288 सदस्य आहेत. त्यामुळे सरकार स्थापन करण्यासाठी 145 आमदारांची गरज आहे. शिवसेनेच्या एका आमदाराचा मृत्यू झाल्याने आता 287 आमदार उरले असून सरकार स्थापन करण्यासाठी 144 आमदारांची गरज आहे. बंडखोरीपूर्वी शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीला 169 आमदारांचा पाठिंबा होता, तर भाजपकडे 113 आमदार आणि 5 अन्य आमदार विरोधी पक्षात होते.

महाविकास आघाडीचे संख्याबळ किती :
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 169 आमदारांचा पाठिंबा होता. यात शिवसेनेच्या 56, राष्ट्रवादीच्या 53 आणि काँग्रेसच्या 44 आमदारांचा समावेश आहे. याशिवाय सरकारला सपाचे 2, पीजीपीचे 2, बविआचे 3 आणि 9 अपक्ष आमदारांचा पाठिंबा होता.

भाजपचे 113 आमदार :
महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी पक्ष भाजपला 113 आमदारांचा पाठिंबा आहे. यामध्ये भाजपचे 106, रासप 1, जेएसएसचे 1 आणि 5 अपक्षांचा समावेश आहे. विधानसभेत इतर पक्षांचे 5 आमदार आहेत. यामध्ये AIMIM चे 2, CPI(M) 1 आणि MNS च्या 1 आमदारांचा समावेश आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Eknath Shinde political proposal to Shivsena chief Uddhav Thackeray check details 21 June 2022.

हॅशटॅग्स

#Eknath Shinde(96)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x