3 May 2024 2:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Stocks To Buy | सुवर्ण संधी! तज्ज्ञांनी निवडले टॉप 5 शेअर्स, झटपट 45 टक्केपर्यंत कमाई होईल PSU Stocks | मल्टिबॅगर सरकारी कंपनीच्या शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'ओव्हरवेट' रेटिंग, पुढची टार्गेट प्राइस मालामाल करणार Yes Bank Share Price | येस बँक शेअरच्या टेक्निकल चार्टनुसार तेजीचे संकेत, मागील 6 महिन्यात 62% परतावा दिला Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरमध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून स्टॉक रेटिंग अपग्रेड BHEL Share Price | PSU शेअर सुसाट तेजीत, 1 वर्षात 258% परतावा दिला, अजून एक सकारात्मक अपडेट
x

शिंदेंना थेट मुख्यमंत्री पदाची ऑफर | शिंदेंच्या मागण्या भाजप पुरस्कृत आहेत कि प्रामाणिक आहेत ते सिद्ध होणार

Eknath Shinde

Eknath Shinde | सूरतला जाऊन बोलण्यापेक्षा सरळ समोर येऊन बोलायला हवं होतं. मी उठलो असतो, जर त्यापैकी एकाही आमदाराने मला समोर येऊन बोलले असते तर मी आताच्या आता राजीनामा द्यायला तयार आहे. राजीनाम्याचं पत्र तयार करतो. आजच मी माझा मुक्काम वर्षावरुन मातोश्रीवर हलवतोय. मला कोणताही मोह नाही . फक्त माझ्या समोर येऊन बोला. यामुळे नुकसान कोणाचं होत आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. आज राजीनाम्याचं पत्र तयार करुन ठेवतो. जे आमदार गायब आहेत त्यांनी यावं आणि ते पत्र घेऊन जावं, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मी मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर शिवसेनाचा मुख्यमंत्री होत असेल तर मला आनंद आहे. फक्त मला हे समोरून येऊन सांगा. तुम्ही या, माझ्याशी बोला मग आपण बघू., बंडखोरीवर स्पष्ट बोलले मुख्यमंत्री.

शिंदेंच्या मागण्या भाजप पुरस्कृत :
मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आवाहनाला एकनाथ शिंदे यांनी देखील इमोशनल उत्तर दिलं आहे. शिंदे सध्या त्यांच्या समर्थक आमदारांसह गुवाहाटीमध्ये आहेत. त्यांनी यावेळी थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा दाखला देत उत्तर दिलं आहे. काँग्रेससोबत जायचं नाही, हे बाळासाहेबच बोलले होते. त्यावर मुख्यमंत्री काहीच बोलले नाहीत. समविचारी पक्षांसोबत राहायचं ही बाळासाहेबांचे हे मुख्य विचार आहेत, अशी भावनिक साद शिंदे यांनी घातली आहे. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर शिंदे त्यांच्या समर्थक आमदारांशी चर्चा करत असून या चर्चेनंतरच ते मुख्यमंत्र्यांना उत्तर देणार आहेत.

विधानसभा उपाध्यक्षांना पत्र :
एकनाथ शिंदे यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना पत्र लिहलंय. या पत्रामध्ये 34 आमदारांच्या सह्या आहेत. शिवसेनेच्या 55 पैकी 34 आमदारांच्या या पत्रावर सह्या असल्यानं बहुसंख्य आमदार हे शिंदे यांच्यासोबत आहेत, त्यामुळे ठाकरे सरकार आता अल्पमतामध्ये आलं आहे. विधानसभेतील बहुमतदासाठी आवश्यक असलेली 145 आमदारांची मॅजिक फिगर महाविकास आघाडी सरकारकडं नाही, हे आता स्पष्ट झाले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Eknath Shinde political stand against Shivsena now got offer of CM post check details 22 June 2022.

हॅशटॅग्स

#Eknath Shinde(96)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x