28 September 2022 11:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
LIC Share Price | एलआयसी गुंतवणूकदारांचं प्रचंड नुकसान, पडझड थांबणार तरी कधी?, तज्ज्ञ काय सांगतात जाणून घ्या सविस्तर Mutual Fund Investment | म्युच्युअल फंड SIP मार्फत 1 कोटीचा निधी कसा तयार करता येईल | वाचा सविस्तर Aishwarya Rai Video | मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय बच्चन पुन्हा प्रेग्नंट?, एअरपोर्टवरील व्हिडीओ प्रचंड व्हायरल Vivo X Fold Plus | जबरदस्त डिस्प्लेसह विवो X Fold Plus स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स Post Office Scheme | विश्वसनीय सरकारी योजना, 10 हजाराच्या गुंतवणुकीवर 16 लाखाचा परतावा मिळवा, योजनेचा तपशील जाणून घ्या Navi Mutual Fund | होय हे खरं आहे, अवघ्या 10 रुपयांपासून या म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक करा, लाखोमध्ये परतावा मिळवा Mobile Safety | तुम्हाला प्रवासादरम्यान मोबाइल चोरीला जाण्याची भीती आहे?, इथे ऑनलाईन नोंदणी करा, टेन्शन मुक्त व्हा
x

Gujarat Election | देशात सोडा, आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीतही भाजप पराभवाच्या छायेत, 'आप' धक्का देणार - सर्व्हे

Gujarat Assembly Election

Gujarat Assembly Election | गुजरातमध्ये या वर्षाच्या शेवटी विधानसभा निवडणूक पार पडणार आहेत. त्यासाठी आप पक्ष जोरदारपणे कामाला लागला आहे. पंजाबनंतर आता थेट गुजरातमध्ये विजयाच्या दिशेने तयारी सुरु केली आहे. विशेष म्हणजे येथे अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या नेत्यांच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने इथली जनता भाजपच्या २७ वर्षाच्या कारभाराला कंटाळल्याचं लोकांच्या प्रतिक्रियांमधून पाहायला मिळतंय.

विशेष म्हणजे ६ महिन्यांपूर्वी केलेल्या सर्व्हेत आप पक्षाला सध्या जवळपास 58 जागा जिंकण्याचे संकेत मिळाले आहेत. स्वतः आप पक्षाने एका मोठ्या एजन्सीकडून करून घेतलेल्या सर्वेक्षणातून आकडेवारी समोर आली आहे, असा दावा आम आदमी पार्टीने (आप) केला आहे. आणि हा आकडा वर्षाअखेर पर्यंत दुप्पट होऊ शकतो असं म्हटलंय. प्रसिद्ध एजन्सीच्या माध्यमातून शास्त्रीय पद्धतीने हे सर्वेक्षण करण्यात आले,’ असे ते म्हणाले.

गुजरात भाजप सरकारच्या सर्व्हेतही धक्कादायक आकडेवारी समोर :
काँग्रेस इथे भाजपला पराभूत करू शकत नाही, असं गुजरातच्या ग्रामीण आणि शहरी भागातील जनतेचं मत आहे. त्यामुळे इथे लोकांनी आप पक्षाला जवळ केल्याचं म्हटलं जातंय. जसजसे दिवस पुढे सरकत आहेत तसं आपला समर्थन वाढताना दिसत आहे आणि त्यामुळे भाजपाची धाकधूक वाढली आहे. राज्यातील भाजप सरकारच्या राज्य गुप्तचर विभागाने ४ महिन्यापूर्वी केलेल्या सर्वेक्षणात ‘आप’ला ५५ जागा दिल्या आहेत आणि तो आकडा प्रत्यक्ष विधानसभा निवडणुकीपूर्वी दुप्पटीहून अधिक होऊ शकतो असं दावा करण्यात आला आहे.

त्यामुळे आपचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी गुजरातचे दौरे आणि प्रचार कार्यक्रम वाढवल्याचं पाहायला मिळतंय. या दरम्यान मोठ्या प्रमाणावर रोड शोसह काही कार्यक्रम आयोजित करण्यावर भर दिला जातं आहे.

आपच्या शिस्तबद्ध प्रचार यंत्रणेची भीती :
आम आदमी पक्षात मोठ्या प्रमाणावर सुशिक्षित तरुणाची टीम असल्याने भाजपच्या प्रचार यंत्रणा पूर्णपणे फेल होताना दिसत आहेत. भाजप त्यांना लक्ष करताना धार्मिक मुद्द्यावरून हल्ला करत आहे, परंतु आप त्यावर भाष्य न करता केवळ शिक्षण, वीज, पायाभूत सुविधा, बेरोजगारी आणि महागाईवर ‘फोकस’ प्रचार करत असल्याने भाजपच्या अडचणी अजून वाढत आहेत. त्यामुळे नेमकं काय करावं याची चिंता गुजरातमधील भाजप नेत्यांना सतावत आहे. विशेष म्हणजे गुजराती व्यापारी देखील भाजपच्या सरकारवर आणि राज्यातील भ्रष्ट सरकारी बाबूंना कंटाळून आप पक्षाच्या सेमिनारमध्ये हजेरी लावत आहेत. परिणामी केंद्रातील मोदी सरकार विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने धास्तावल्याने दिल्लीच्या नेत्यांना ईडी, सीबीआयच्या माध्यमातून ट्रॅप करत असल्याचं म्हटलं जातंय. मात्र तरीही आप गुजरातमध्ये फोकस मुद्यांवर प्रचार करत असल्याने भाजपच्या पायाखालील जमीन सरकल्याचं स्थानिक पत्रकार सांगत आहेत. गुजरातमध्ये धक्का बसल्यास २०२४ मधील लोकसभा निवडणुका मोदी आणि भाजपाला धोक्याचे संकेत देणाऱ्या ठरतील असे पत्रकार सांगत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Gujarat Assembly Election check details 15 August 2022.

हॅशटॅग्स

#Gujarat Assembly Election(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x