1 May 2025 12:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | पीएसयू शेअर पुन्हा सुसाट तेजीने परतावा देणार, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL IREDA Share Price | मल्टिबॅगर शेअर मालामाल करणार, स्वस्तात खरेदी करा, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: IREDA GTL Infra Share Price | पेनी स्टॉक 52-वीक लो लेव्हलच्या जवळ; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: GTLINFRA Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL
x

सुराज्याच्या जाहिराती करत शिंदे-फडणवीस सरकार मराठा समाजावर करतंय अमानुष लाठीचार्ज, फडणवीसांचा आंदोलकांवर दोष, राज्यभर संताप

Jalna Maratha Akrosh Morcha

Maratha Morcha Protest | जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी जिल्ह्यात मराठा आक्रोश मोर्चावर पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्या लाठीचार्जमध्ये आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्यासह अनेक स्त्री-पुरुष जखमी झाले. अंतरवाली सराटीमध्ये लाठीचार्ज झाल्याचे वृत्त पसरताच राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे.

शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला

या घटनेमुळे सत्ताधारी आणि गृह खात्यावर ठपका ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. हे प्रकरण शांत नाही झालं तर मला आंदोलनकर्त्यांची भेट घ्यावी लागेल असा सूचक इशारा त्यांनी दिला होता. त्यानंतर आज शरद पवार आणि भाजपचे खासदार उदयनराजे आंदोलनकर्त्यांची भेट घेणार आहेत.

गृहमंत्री फडणवीसांकडून मराठा आंदोलकांवर दोष

जालन्यातील घटना ही दुर्दैवी पण आहे आणि गंभीरपण आहे. पण त्याठिकाणी जे उपोषणकर्ते होते त्यांच्याशी स्वत: मुख्यमंत्री बोलले होते. विविध प्रकारे त्यांच्याशी आमचा संवाद सुरू होता. त्यांनी उपोषण परत घ्यावं.. कारण मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकार गंभीरतेने काम करतेय पण हा न्यायालयाशी संबंधित सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित विषय आहे. त्यामुळे हा विषय काही एका दिवसात संपणारा नाही. तो सोडविण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न हे चालले आहेत. हे गंभीरपणे प्रयत्न सुरू आहेत.’

आंदोलनकर्त्यातून तीव्र पडसाद

मराठा आक्रोश मोर्चावर लाठीचार्ज झाल्यानंतर राज्यभरातून त्यावर आता प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. त्यातच लाठीचार्ज झाल्यानंतर आंदोलनकर्त्यातून तीव्र पडसाद उमटत आहेत. लाठीचार्ज झाल्यानंतर अनेक वाहनांची जाळपोळ करण्यात आली आहेत. त्यामुळे आज आंदोलनाचा कोणताही परिणाम वाहनांवर होऊ नये यासाठी जालन्यासह या भागातील अनेक बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

राजकीय वातावरण ढवळून निघाले

मराठा आक्रोश मोर्चावर लाठीचार्ज झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांवर टीका केली जात आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. लाठीचार्ज झाल्यानंतर वेगवेगळे पडसाद उमटत असल्याने प्रशासनाकडूनही शांततचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यभरात वेगवेगळे पडसाद उमटत असतानाच मुख्यमंत्र्यांनी उच्चस्तरीय समिती नेमणार असल्याचे सांगितले आहे.

News Title : Jalna Maratha Akrosh Morcha Protest check details on 02 September 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Maratha Resrvation(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या