2 May 2025 11:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

Lok Sabha Election 2024 | देशाचा पुढचा पंतप्रधान कोण होणार? राहुल गांधी की मोदी? या सर्व्हे आकडेवारीने भाजपाची झोप उडणार

Lok Sabha Election 2024

Lok Sabha Election 2024 | पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक आहेत. भाजप, काँग्रेससह सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. अलीकडच्या काळात समोर आलेल्या विविध विधानसभा आणि लोकसभा सर्वेक्षणांमधून काँग्रेसला होतं असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच मोदींसाठी तिसऱ्यांदा सत्तेत येणं अवघड असल्याचे देखील संकेत मिळत आहेत. पण आता विरोधकांच्या आघाडीने भाजप मोठ्या पराभवाच्या अजून जवळ जातं असल्याचं म्हटलं जातंय.

निवडणुकीवर बारकाईने लक्ष ठेवणाऱ्या सीएसडीएस या संस्थेच्या आकडेवारीनुसार भाजपच्या विरोधातील सर्व पक्षांनी एकत्र निवडणूक लढविल्यास पुढील लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांना सहज बहुमत मिळेल असं म्हटलं आहे. सीएसडीएसने गेल्या वर्षी सर्व पक्षांना मिळालेल्या जागा आणि मतांच्या टक्केवारीनुसार हा आकडा ग्राह्य धरला आहे.

सीएसडीएसच्या आकडेवारीचा हवाला देत ‘आजतक’ने दिलेल्या वृत्तानुसार, भाजप वगळता सर्व पक्षांनी एकत्र निवडणूक लढविल्यास भाजपला २३५ ते २४० जागांवर समाधान मानावे लागेल, तर विरोधकांना ३०० ते ३०५ जागा मिळतील. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 303 तर विरोधकांना 236 जागा मिळाल्या होत्या. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि इतर पक्षांच्या मतांच्या टक्केवारीनुसार सीएसडीएसने हा आकडा मोजला आहे.

भाजपची मते एक-दोन टक्का कमी झाल्यास?
आगामी सार्वत्रिक निवडणुकीत भाजपची मते एक टक्का कमी झाली तर जागांची संख्या २२५-२३० पर्यंत कमी होऊ शकते, तर विरोधकांसाठी हा आकडा ३१०-३२५ इतका असेल. तर भाजपची दोन टक्के मते कमी झाली तर जागांची संख्या २१०-२१५ पर्यंत कमी होईल. तर विरोधकांच्या जागांचा आकडा ३२५-३३० असेल. पण हे तेव्हाच होईल जेव्हा इतर सर्व पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवतील.

आज तक’कडून पुढचा पंतप्रधान कोण होईल असा सर्व्हे आणि निकाल धक्कादायक
आज तक या हिंदी TV वृत्तवाहिनीने एक ऑनलाईन सर्व्हे घेतला असून त्यात तब्बल 1 लाख 51 हजार लोकांनी सहभाग घेत आपलं मत नोंदवलं आहे. या सर्व्हेत लोकांना प्रश्न विचारला गेला की, “देशाचा पुढचा पंतप्रधान कोण होणार? राहुल गांधी की नरेंद्र मोदी?”. या सर्व्हे आकडेवारीने भाजपाची झोप उडणार असंच म्हणावं लागेल. कारण सर्व्हेत तब्बल ८० टक्के लोकांनी राहुल गांधी यांच्या बाजूने कौल दिला आहे. विशेष म्हणजे या सव्हेतील 1 लाख 51 हजार सॅम्पल हा खूप मोठा आकडा आहे आणि त्यावरून देशातील लोकांचा एकूण कल अधोरेखित होतोय. कारण या सर्व्हेत नरेंद्र मोदी यांना राहुल गांधी यांच्या आसपास देखील पोहोचता आलेलं नाही. तसेच या सर्व्हे लोकांनी केलेल्या ९५ टक्के कमेंट्स या नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आहेत हे विशेष म्हणावे लागेल. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत लोकांचं कल समोर येतं असून आगामी लोकसभा निवडणूक ही नरेंदर मोदी यांची शेवटची निवडणूक असेल असं म्हटलं जातंय.

तुमची हा सव्हे येथे पाहू शकता – येथे क्लिक करा

Rahul Gandhi

News Title : Lok Sabha Election 2024 Aaj Tak Online Survey check details on 25 June 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Lok Sabha Election 2024(20)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या