Lok Sabha Election 2024 | लोकसभा निवडणूक 2024 च्या तयारीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएच्या खासदारांसोबत बैठकांची फेरी सुरू केली आहे. यावेळी त्यांनी खासदारांना विवादित वक्तव्यांपासून दूर राहण्याचा आणि विरोधकांच्या प्रतिक्रियेला टाळण्याचा सल्ला दिल्याचे समजते. मात्र, भारतीय जनता पक्षाकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. बुधवारी पंतप्रधानांनी पूर्व उत्तर प्रदेशातील खासदारांसोबत पहिली बैठक घेतली.
एका मीडिया रिपोर्टनुसार असे म्हटले जात आहे की, पंतप्रधानांनी भाजप नेत्यांना वादग्रस्त वक्तव्यांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. विरोधक हताश झाले असून तुम्हाला चिथावण्याचा खूप प्रयत्न करतील, त्यामुळे खासदारांनी त्यावर व्यक्त होणं टाळावं, असेही ते म्हणाले. याआधीही पंतप्रधान मोदींनी नेत्यांना असा सल्ला दिला आहे. रिपोर्टनुसार, पंतप्रधान मोदीयांनी यापूर्वी खासदारांना माइकपासून दूर राहण्याचा आणि दिलेल्या कामावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला होता.
यापूर्वी भाजप विवादित वक्तव्यांमुळे अडचणीत आला होता
2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी महात्मा गांधींबद्दल एक वक्तव्य केले होते, ज्यानंतर खुद्द पंतप्रधानांनी प्रतिक्रिया दिली होती. खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या वक्तव्याबद्दल आपण त्यांना कधीही माफ करू शकणार नाही, असे त्यांनी म्हटले होते. गेल्या वर्षी मे महिन्यात पक्षाच्या तत्कालीन प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी पैगंबर मोहम्मद यांच्याविषयी वक्तव्य केले होते, त्यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती.
एनडीए’च्या बैठका
आतापर्यंत पंतप्रधान मोदींनी पहिल्या बैठकीत पूर्व उत्तर प्रदेशातील खासदारांची भेट घेतली आहे. दुसऱ्या बैठकीत त्यांनी आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि अंदमान-निकोबार बेटांवरील खासदारांशी चर्चा केली. विरोधकांकडून पसरवण्यात येत असलेल्या अफवा दूर करा आणि केंद्राच्या योजनांबद्दल लोकांना सांगा, असे त्यांनी उत्तर प्रदेशातील आघाडीतील घटक पक्षांना सांगितले होते.
News Title : Lok Sabha Election 2024 NDA Meeting check details on 03 August 2023.
 
						 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		